डब्यात नेता येतील असे भाताचे '५' प्रकार , मोजून २० मिनिटांचे काम, गार भातही लागेल चविष्ट

Updated:May 30, 2025 19:22 IST2025-05-30T19:15:59+5:302025-05-30T19:22:08+5:30

'5' types of rice that can be carried in tiffin : डब्यात घेऊन जाण्यासाठी भाताच्या रेसिपी. डब्यातून बाहेर येण्याची चिंता नाही. तसेच करायला अगदी सोपे असे पदार्थ.

डब्यात नेता येतील असे भाताचे '५' प्रकार , मोजून २० मिनिटांचे काम, गार भातही लागेल चविष्ट

डब्याला रोज वेगळी कोणती भाजी न्यायची ? हा रोजचाच एक मोठा प्रश्न असतो. आपला डबा, मुलांचा डबा, नवऱ्याचा डबा इतर लोकांचे डबे असतातच. ते करताना वेळ कमी पडतो आणि रेसिपीही. नेहमी कोणती वेगळी भाजी करणार याची चिंता लागलेली असते.

डब्यात नेता येतील असे भाताचे '५' प्रकार , मोजून २० मिनिटांचे काम, गार भातही लागेल चविष्ट

मात्र डब्यात फक्त भाजी पोळीच न्यावी असा काही नियम नाही. डब्यात भातही नेता येतो. काही जणांचे फक्त पोळीने पोट भरत नाही. त्यांना भाताची सवय असते. त्यामुळे एका डब्यात थोडा भात नेणे नक्कीच फायद्याचे ठरेल.

डब्यात नेता येतील असे भाताचे '५' प्रकार , मोजून २० मिनिटांचे काम, गार भातही लागेल चविष्ट

डब्यात आमटी भात न्यायचा म्हणजे सांडायची चिंता वाटते. पण मग आमटी भात सोडून कोणते पदार्थ डब्यात घेता येऊ शकतात का ? तर नक्कीच येतात. काही सोप्या रेसिपी आहेत ज्या डब्यासाठी अगदी छान ठरतील सगळे आवडीने जेवतील.

डब्यात नेता येतील असे भाताचे '५' प्रकार , मोजून २० मिनिटांचे काम, गार भातही लागेल चविष्ट

फोडणीचा भात आपण नाश्त्याला करतो. शिळा भात फोडणी देऊन खातो. मात्र ताज्या भाताला कांदा बटाटा घालून फोडणी देऊन तो भात डब्यात नेता येईल. चवीला तर अगदी मस्त लागतो. छान चमचमीत फोडणी द्यायची.

डब्यात नेता येतील असे भाताचे '५' प्रकार , मोजून २० मिनिटांचे काम, गार भातही लागेल चविष्ट

तोंडली भात करायला तसा अगदीच सोपा आहे. तोंडली न आवडणाऱ्यांनाही ही रेसिपी फार आवडेल. हा भात सुका असतो त्यामुळे डब्यातून बाहेर येत नाही.

डब्यात नेता येतील असे भाताचे '५' प्रकार , मोजून २० मिनिटांचे काम, गार भातही लागेल चविष्ट

मसाले भात हा प्रकार आपण समारंभांमध्ये खातो. फार आवडीने खातो. डब्यासाठी मसाले भात अगदी छान रेसिपी आहे. बिर्याणी राईसच हवा असे काही नाही साधा भात घ्या, मस्तच लागतो.

डब्यात नेता येतील असे भाताचे '५' प्रकार , मोजून २० मिनिटांचे काम, गार भातही लागेल चविष्ट

टोमॅटो भात हा एक फारच चमचमीत असा पदार्थ आहे. चवींची मेजवानीच आहे. करायला अगदीच सोपा आहे. त्यामुळे नक्की करा आणि तुमच्या सह-कर्मचार्‍यांनाही खाऊ घाला त्यांना नक्की आवडेल.

डब्यात नेता येतील असे भाताचे '५' प्रकार , मोजून २० मिनिटांचे काम, गार भातही लागेल चविष्ट

लेमन राईस हा फार साधा भाताचा प्रकार आहे. हा एक लोकप्रिय साऊथ इंडियन पदार्थ आहे. करायला फारच सोपा आहे आणि लिंबाची आंबट गोड चव भाताची चव वाढवते. तसेच लाल तिखट घालून झणझणीतही करता येतो.