1 / 7वर्षभराचे मसाले आपण एकदाच घरी करतो किंवा मग विकत आणून ठेवतो. पण काही जणींचा अनुभव असा आहे की मसाल्यांची चव आणि सुगंध हळूहळू कमी कमी होत जातो. 2 / 7तुमचाही असाच अनुभव असेल तर मसाले साठवून ठेवताना या काही साध्या सोप्या गोष्टी लक्षात ठेवा. यामुळे मसाल्यांचा सुगंध, रंग आणि चवसुद्धा वर्षभर जशासतशीच राहील.3 / 7लाल तिखट तुम्ही ज्या बरणीमध्ये साठवून ठेवणार आहात त्या बरणीमध्ये तिखट भरल्यानंतर त्यावर एक कागद ठेवा आणि त्या कागदावर थोडे मीठ टाकून ठेवा. तिखट खराब होणार नाही.4 / 7 काळा मसाला साठवून ठेवताना त्यामध्ये २- ४ लवंगा, दालचिनीचा एखादा तुकडा खोचून ठेवा. मसाल्याचा सुगंध जशासतसा राहील.5 / 7जीरे पावडरचा सुगंध आणि चव टिकून राहण्यासाठी जिरे पावडरमध्ये थोड्या लवंग घालून ठेवा. महिनोंमहिने जिरे पावडर खराब होणार नाही.6 / 7हळदीचा रंग आणि सुगंध टिकवून ठेवण्यासाठी हळदीच्या बरणीमध्ये थोडे तेजपान घालून ठेवावे. 7 / 7धने खराब होऊ नयेत म्हणून ते आणल्यावर थोडे भाजून ठेवा. ६ महिने तरी धन्यांना काहीच होणार नाही.