महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Updated:April 4, 2026 17:27 IST2026-04-04T17:09:30+5:302026-04-04T17:27:04+5:30
निसर्गाने आपल्याला अशी काही फळं दिली आहेत, जी आपली नैसर्गिक सुंदरता टिकवून ठेवण्यास मदत करतात.

उन्हाळा सुरू झाला की वाढत्या तापमानामुळे चेहऱ्याची चमक कमी होते. कडक उन्हामुळे चेहऱ्याचा नैसर्गिक ग्लो जाऊन त्वचा काळवंडते. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी अनेकजण महागड्या ब्युटी प्रोडक्ट्सचा आधार घेतात.
तुम्हाला माहिती आहे का? निसर्गाने आपल्याला अशी काही फळं दिली आहेत, जी आपली नैसर्गिक सुंदरता टिकवून ठेवण्यास मदत करतात. उन्हाळ्यात तुमच्या त्वचेला नैसर्गिक चमक देतात. अशाच काही फळांबदद्ल जाणून घेऊया...
कलिंगड
कलिंगडमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी, फायबर आणि पाणी असतं. व्हिटॅमिन सी उन्हामुळे आलेला काळपटपणा दूर करण्यास मदत करतं.
जर तुम्ही टॅनिंगमुळे त्रस्त असाल, तर आहारात कलिंगडचा समावेश नक्की करा. हे केवळ त्वचेला ग्लो देत नाही, तर शरीराचं तापमान संतुलित राखण्यासही मदत करतं.
संत्री
संत्र्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं. संत्र्याचा गर आणि साल दोन्ही त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहेत.
संत्र केवळ त्वचेला खोलवर पोषण देत नाही, तर चेहऱ्यावरील गडद डाग कमी करण्यासही मदत करतं. संत्र्याच्या सालीचा वापर फेसपॅक तयार करण्यासाठी देखील केला जातो.
काकडी
काकडी केवळ सॅलडचा भाग नसून ती पोट आणि त्वचा दोघांसाठी आरोग्याचा खजिना आहे. काकडी संपूर्ण शरीराला हायड्रेट ठेवते. आहारात आवर्जून काकडीचा वापर करा.
चेहऱ्याचा कोरडेपणा कमी करण्यास मदत करते. अनेक स्किन ट्रीटमेंट्समध्येही काकडीचा वापर केला जातो. डोळ्यावर काकडी ठेवल्याने डोळ्यांना आराम मिळतो.
आंबा
आंबा जरी उष्ण असला तरी तो त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असतो. आंब्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे चेहऱ्याची हरवलेली चमक परत आणण्यास मदत करतात.
योग्य प्रमाणात आंब्याचं सेवन केल्यास ते संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर ठरतं.
नारळ पाणी
नारळ पाणी शरीराला हायड्रेट ठेवण्यासोबतच त्वचा चमकदार आणि मऊ ठेवण्यास मदत करतं. उन्हाळ्यात दररोज एक नारळ पाणी प्यायल्यास पोट आणि त्वचा दोन्ही चांगलं राहतं.