फक्त भात खिचडीसाठीच नाही; 'या' कामांसाठीही कुकरची मदत घ्या, अवघड कामं होतील सोपी, झटपट
Updated:December 14, 2025 09:35 IST2025-12-14T09:33:28+5:302025-12-14T09:35:02+5:30

बहुतांश घरांमध्ये फक्त वरण भाताचा कुकर लावण्यासाठी किंवा खिचडी करण्यासाठीच प्रेशर कुकर वापरला जातो. पण त्याच्या मदतीने कित्येक अवघड कामं सोपी आणि लवकर होतात.
हिवाळा असल्याने दही लवकर लागत नाही. त्यामुळे कुकर थोडं गरम करून घ्या आणि दही लावलेलं पातेलं गरम कुकरमध्ये घालून ठेवा. दही खूप लवकर विरजेल आणि घट्ट होईल.
सध्या हिवाळा असल्याने पोळ्या खूप लवकर थंड होतात. थंड झालेल्या पोळ्या कुकरमध्ये ठेवून एखादा मिनिटे गॅस सुरू करा. सगळ्याच पोळ्या अगदी गरमागरम होतील.
इडलीचं पीठही हिवाळ्यात लवकर आंबत नाही. त्यासाठीही प्रेशर कुकरची मदत घेता येते. दह्याप्रमाणेच इडलीचं पीठही आंबविण्यासाठी गरम कुकरमध्ये ठेवून द्या. पिठाला उष्णता मिळून ते लवकर आंबवलं जाईल.
घरात ओव्हन नसेल तर कुकरचा वापर करून त्यात केक, पेस्ट्री, बिस्किटे, नानकटाई असे वेगवेगळे बेकिंग प्रोडक्ट तयार करता येात.
डाळ बट्टी खाण्याचा विचार असेल तर कुकरमध्ये तुम्ही बट्टीही खूप लवकर अणि झटपट करू शकता. एकदा ट्राय करून पाहा.