ओव्याचे १० उपयोग जे कधी ऐकलेही नसतील.. ओव्याची पाने म्हणजे ऑल इन वन सॉल्यूशन
Updated:February 9, 2025 19:57 IST2025-02-09T19:49:10+5:302025-02-09T19:57:32+5:30
10 Uses Of carom/Ajwain That You May Have Never Heard Of : ओव्याचे अनेक उपयोग आहेत. आरोग्यासाठी ओवा म्हणजे खजानाच.

ओव्याच्या पानांची खुसखुशीत भजी आपण तयार करून आपण खातो. पण तुम्हाला ओव्याच्या पानांचे इतर उपयोग माहिती आहेत का?
ओव्याची पाने प्रचंड औषधी असतात. म्हणून घरात ओव्याचं रोप हवंच. नसेल तर लावून घ्या.
१.ओव्यामध्ये अॅन्टिऑक्सिडंट्स असतात. ज्यांच्यामुळे शरीराला कोणतीही लागण होत नाही. ही पाने तुम्हाला सुदृढ राहण्यासाठी मदत करतील.
२.ओव्यामध्ये जैवप्रतिकारक गुणधर्म असतात. जे कोणतेही हानिकारक जीवाणू व वायरस पसरण्यापासून थांबवतात. शरीर सशक्त ठेवण्यासाठीचा हा एक नैसर्गिक उपाय आहे.
३.श्वसनक्रियेला चलन देण्यासाठी ओवा अत्यंत उपयोगी असतो. याचे रोपही भरपूर प्राणवायु उत्पन्न करते.
४. छातीतील किंवा पोटातील जळजळ कमी करण्यासाठी ओवा चांगला. त्याच्यामध्ये दाहविरोधी सत्व असतात.
५. ओवा पचनसंस्था व्यवस्थित ठेवण्यासाठी मदत करतो. ब्लोटिंग कमी करतो. तसेच वजन कमी करण्यातही मदत करतो. गॅसेसची समस्या असेल तर कमी करतो.
६. ओव्यामधील अॅन्टिऑक्सिडंट्स स्ट्रेसची पातळी कमी करण्यास मदत करतात. डोकं शांत राहते. मनही प्रसन्न राहण्यास मदत होते.
७. शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी योग्य राखण्यासाठी ओवा चांगला असतो. त्यामुळे हृदयाचे विकार होत नाहीत.
८. पाळीमध्ये येणारे क्रॅम्प्सही ओव्याने कमी होतात. पोटाला आणि ओटी पोटाला आराम मिळतो.
९. ओव्यात भरपूर जीवनसत्वे असतात. तसेच बरीच पोषकतत्वेही असतात. त्यांच्यामुळे केसांचे आरोग्यही चांगले राहते. तसेच त्वचाही चांगली राहते.
१०. मधुमेहाचा धोका कमी होतो. जर मधुमेहाचा त्रास होत असेल, तर तो कमी करण्यासाठीही ओवा चांगला.