Join us   

कम्प्युटरवर काम करून, दुचाकी चालवून मान खूप दुखते? ६ व्यायाम करा, लगेच मिळेल आराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2024 12:12 PM

1 / 9
हल्ली बहुतांश जणांना लॅपटॉप, कम्प्युटर यावर सलग ८ ते १० तास करावे लागते. कामाच्या दरम्यान कितीही हालचाल केली तरी शेवटी अधिकाधिक वेळ तुमचे शरीर एकाच अवस्थेत राहाते. त्यामुळे बऱ्याचदा मानेवर ताण येतो आणि मान दुखते.
2 / 9
काही जणांना दुचाकी चालवल्यानंतर मानदुखीचा त्रास होतो. जास्त दुचाकी चालवणं झालं तर लगेच मान आखडून येते.
3 / 9
अशा कोणत्या ना कोणत्या कारणाने तुमचीही मान सतत दुखत असेल तर ही काही योगासनं करून पाहा. यामुळे मानेला लगेचच आराम मिळेल.
4 / 9
यामधला सगळ्यात पहिला व्यायाम म्हणजे मान वर- खाली आणि डावीकडून- उजवीकडे या दिशेने प्रत्येकी ५- ५ वेळा हलवावी.
5 / 9
दुसरा व्यायाम म्हणजे मान एकदा उजव्या खांद्याकडे तर एकदा डाव्या खांद्याकडे झुकवावी. हा व्यायामही ५- ५ वेळा करावा.
6 / 9
यानंतर क्लॉकवाईज आणि ॲण्टीक्लॉकवाईज दिशेने मान प्रत्येकी ५- ५ वेळा फिरवावी. महत्त्वाचं म्हणजे हा व्यायाम तसेच वरचे दोन्ही व्यायाम करताना पाठीचा कणा मात्र ताठ ठेवावा.
7 / 9
यानंतर कॅट- काऊ पोझ हे योगासन करावे. यामुळेही मानेचं दुखणं बरं होईल.
8 / 9
दररोज ३० ते ६० सेकंदासाठी बालासन केल्यानेही मानदुखी कमी होते.
9 / 9
फिश पोज किंवा मत्स्यासन केल्याने मानेचे स्नायू योग्य पद्धतीने ताणले जातात. त्यामुळे मग तिथल्या वेदना कमी होण्यास मदत होते.
टॅग्स : फिटनेस टिप्सव्यायामयोगासने प्रकार व फायदे