Yoga Day 2025 : ७ देखण्या-सुडौल मराठी अभिनेत्री, रोज करतात योग आणि दिसतात सुपरफिट!

Updated:June 18, 2025 23:04 IST2025-06-18T18:16:52+5:302025-06-18T23:04:54+5:30

Yoga Day 2025 : Marathi actresses who are follow yoga for fitness : Marathi Actress Who Love Yoga For Fitness : मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक प्रसिद्ध अभिनेत्री फिट राहण्यासाठी करतात योगाभ्यास...

Yoga Day 2025 : ७ देखण्या-सुडौल मराठी अभिनेत्री, रोज करतात योग आणि दिसतात सुपरफिट!

सध्याच्या धावपळीच्या लाईफस्टाईलमध्ये, मानसिक आणि शारीरिक आरोग्य जपण्यासाठी योगा, एक्सरसाइज सारख्या ॲक्टिव्हिटीज करणे अत्यंत गरजेचे (Marathi actresses who are follow yoga for fitness) झाले आहे. आपल्या मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक प्रसिद्ध अभिनेत्रीही या गोष्टीला अत्यंत महत्वाचे मानून नियमितपणे योगाभ्यास करतात.

Yoga Day 2025 : ७ देखण्या-सुडौल मराठी अभिनेत्री, रोज करतात योग आणि दिसतात सुपरफिट!

शरीराला लवचिक, फिट आणि ताजेतवाने ठेवण्यासाठी त्या विविध योगासने, प्राणायाम (Marathi Actress Who Love Yoga For Fitness) आणि ध्यानाचा सराव करतात. अभिनेत्रींच्या स्वतःला फिट ठेवण्याच्या या सवयीमुळे त्या केवळ पडद्यावरच नाही तर प्रत्यक्ष आयुष्यातही आरोग्यदायी आणि फिट दिसतात. मराठी चित्रपटसृष्टीतील अशा काही अभिनेत्रींबद्दल जाणून घेऊया ज्या योगाभ्यासाने आपले आयुष्य समृद्ध आणि अधिक हेल्दी व फिट करत आहेत.

Yoga Day 2025 : ७ देखण्या-सुडौल मराठी अभिनेत्री, रोज करतात योग आणि दिसतात सुपरफिट!

प्राजक्ता माळी ही अभिनेत्री व नृत्यांगना असल्याने तिचं शरीर लवचिक राहण्यासाठी योगासनं करणे ती अत्यंत महत्त्वाचे मानते. सूर्यनमस्कार आणि प्राणायाम ती दररोज न चुकता करतेच. प्राजक्ता प्रामुख्याने अष्टांग योग करते, यामुळे ती मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या फिट राहते.

Yoga Day 2025 : ७ देखण्या-सुडौल मराठी अभिनेत्री, रोज करतात योग आणि दिसतात सुपरफिट!

अमृता खानविलकर आपल्या फिट आणि टोन्ड फिगरसाठी मराठी चित्रपटसृष्टीत अधिकच लोकप्रिय मानली जाते. ती शरीरातील ऊर्जा टिकवण्यासाठी तसेच दिवसभर फ्रेश राहण्यासाठी नियमितपणे योगा करण्याला प्राधान्य देते.

Yoga Day 2025 : ७ देखण्या-सुडौल मराठी अभिनेत्री, रोज करतात योग आणि दिसतात सुपरफिट!

मराठी चित्रपट सृष्टीतील अप्सरा म्हणजेच, अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही बऱ्याचदा योगाचे धडे गिरवताना दिसून येते. सोनाली कुलकर्णी योगामुळे दिवसभर फ्रेश, उत्साही आणि स्ट्रेस फ्री राहते. तिने अनेकदा योगाचे महत्त्व सांगणाऱ्या पोस्ट्स आणि फोटो शेअर केले आहेत.

Yoga Day 2025 : ७ देखण्या-सुडौल मराठी अभिनेत्री, रोज करतात योग आणि दिसतात सुपरफिट!

ऐश्वर्या नारकर अभिनयासोबतच एक उत्तम योगाप्रेमी देखील आहेत. योगाभ्यासामुळे शारीरिक लवचिकता आणि मानसिक शांती मिळत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. बऱ्याचदा त्या आपले योगाभ्यास करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

Yoga Day 2025 : ७ देखण्या-सुडौल मराठी अभिनेत्री, रोज करतात योग आणि दिसतात सुपरफिट!

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री उर्मिला कोठारे नियमितपणे योगाभ्यास करून स्वतःच्या फिटनेसची काळजी घेते. योगाभ्यास हा तिच्या दैनंदिन जीवनाचा महत्वाचा भागच आहे. शूटिंग दरम्यान स्वतःला ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी उर्मिला योगाभ्यासाची मदत घेते. काहीवेळा तिने योगाभ्यास तिच्या मेकअप रूममध्ये सुद्धा केले आहेत, ज्याचा अनुभव ती सोशल मीडियावर देखील शेअर करत असते.

Yoga Day 2025 : ७ देखण्या-सुडौल मराठी अभिनेत्री, रोज करतात योग आणि दिसतात सुपरफिट!

प्रिया फिटनेस उत्तम राहावा यासाठी योगाभ्यास करणे अधिक पसंत करते. प्रिया एरियल योगा प्रकार करण्यावर अधिक भर देते. विशेष म्हणजे तिचा पती अभिनेता उमेश कामत हाही तिला यात साथ देतो.

Yoga Day 2025 : ७ देखण्या-सुडौल मराठी अभिनेत्री, रोज करतात योग आणि दिसतात सुपरफिट!

सोनाली खरे योगाभ्यास केवळ शारीरिक व्यायाम म्हणून नाही तर, तिने तो आपल्या लाईफस्टाईलचा अविभाज्य भाग बनवला आहे. तिच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनी आणि नियमितपणे केलेल्या योगासनांमुळे स्वतःचे शारीरिक व मानसिक आरोग्य मजबूत केले आहे.