'छावा' साठी विकी कौशलने केलं प्रोटीन रिच डाएट, पाहा त्यानं नेमकं काय काय खाल्लं

Updated:February 15, 2025 18:49 IST2025-02-13T19:54:29+5:302025-02-15T18:49:09+5:30

Vicky Kaushal ate a protein-rich veggie diet for ‘Chaava’, says co-star Ankit Anil Sharma : Vicky Kaushal on gaining weight for Chhaava: ‘I went from 80 to 105 kilos’ : Vicky Kaushal on gaining weight for Chhaava : छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी विकी कौशलने घेतले कठोर परिश्रम...

'छावा' साठी विकी कौशलने केलं प्रोटीन रिच डाएट, पाहा त्यानं नेमकं काय काय खाल्लं

विकी कौशलचा (Vicky Kaushal) 'छावा' हा चित्रपट येत्या १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाची सगळीकडे उत्सुकता लागली आहे. विकी कौशल छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. संभाजी महाराज या पात्राला न्याय मिळावा म्हणून विकी कौशलने कठोर मेहनत घेतलेली आहे.

'छावा' साठी विकी कौशलने केलं प्रोटीन रिच डाएट, पाहा त्यानं नेमकं काय काय खाल्लं

या चित्रपटाच्या तयारीसाठी विकी कौशलने २५ किलो वजन वाढवले होते. वजनाचा फोटोदेखील विकी कौशलने अपलोड केला आहे. सर्जिकल स्ट्राईकनंतर या ऐतिहासिक चित्रपटाचा भाग असणे ही त्याच्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे त्याने सांगितले. विकीने या चित्रपटासाठी स्वतःला पूर्णपणे (Vicky Kaushal ate a protein-rich veggie diet for ‘Chaava’, says co-star Ankit Anil Sharma) तयार केलं आहे.

'छावा' साठी विकी कौशलने केलं प्रोटीन रिच डाएट, पाहा त्यानं नेमकं काय काय खाल्लं

या चित्रपटात सिंहासारखे शरीर मिळवण्यासाठी विकी कौशलने खूप मेहनत घेतली आहे. या संदर्भात विकीने स्वतः आपला अनुभव शेअर केला आहे. विकीने त्याचे वजन ८० किलोवरून १०५ किलोपर्यंत वाढवलं आहे. या चित्रपटासाठी त्याने सलग ७ महिने त्याच्या शरीरासाठी मेहनत घेतली आहे.

'छावा' साठी विकी कौशलने केलं प्रोटीन रिच डाएट, पाहा त्यानं नेमकं काय काय खाल्लं

जीममध्ये भरपूर वर्कआऊट करण्यासोबतच त्याने स्वतःच्या डाएटकडे देखील विशेष लक्ष दिले असल्याचे दिसते. या दरम्यान विकी प्रोटीन रिच व्हेज डाएट घेत असल्याचे सिक्रेट चित्रपटांत संताजी घोरपडे यांची भूमिका साकारणारा अभिनेता अंकित अनिल शर्मा याने शेअर केले आहे.

'छावा' साठी विकी कौशलने केलं प्रोटीन रिच डाएट, पाहा त्यानं नेमकं काय काय खाल्लं

विकीने प्रोटीन रिच व्हेज डाएटमध्ये सोया चंक्स, मशरूम आणि बीटरूट टिक्की अशा पौष्टिक पदार्थांचा समावेश केला होता.

'छावा' साठी विकी कौशलने केलं प्रोटीन रिच डाएट, पाहा त्यानं नेमकं काय काय खाल्लं

पुढे अभिनेता अंकित शर्मा सांगतो की, बरेचदा आम्ही विकी सोबत एकत्रित बसून जेवण केले आहे. तो खात असलेले अन्नपदार्थ हेल्दी आणि पौष्टिक तर होतेच शिवाय तितकेच चविष्ट देखील होते.