Join us

एकाजागी तासंतास बसून काम करणं चेन स्माेकिंगपेक्षा घातक! ५ टिप्स- जगणं मुश्किल होण्यापूर्वी सावरा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2025 16:25 IST

1 / 6
हल्ली बदललेल्या कामाच्या स्वरुपामुळे बहुतांश लोकांना एकाजागी सलग काही तास बसून काम करावे लागते. त्याचा आपल्या तब्येतीवर किती वाईट परिणाम होऊ शकतो याची आपण विचारही करत नाही.
2 / 6
म्हणूनच अशा पद्धतीने ज्यांना काम करावं लागतं त्यांनी कोणत्या गोष्टी कटाक्षाने करायलाच हव्या, याविषयी डॉ. अवंती दामले यांनी खास माहिती दिली आहे. त्या सांगतात की एका जागी १ तासापेक्षा जास्त वेळ बसू नये. तज्ज्ञ असं सांगतात की अमेरिकन स्पोर्ट मेडिसिन रिपोर्टनुसार असं सिद्ध झालं आहे की सलग ३ तास एका जागी बसून राहाणे म्हणजे १ सिगरेट ओढल्यासारखं आहे. एवढे त्याचे शरीरावर दुष्परिणाम होत असतात.
3 / 6
त्यामुळे कामात जरी असलात तरी तासाभराने उठा. काही ना काही शारिरीक हालचाल नक्की करा.
4 / 6
नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण झाल्यानंतर प्रत्येक वेळी १०० पावलं तरी चालायलाच हवीत. म्हणजेच शतपावली करायला विसरू नका.
5 / 6
दर तासाला आठवणीने पाणी प्यायलाच हवं. बॉडी डिटॉक्स करण्याचा तो एक नैसर्गिक उपाय आहे. त्यामुळे दर तासाला पाणी प्या. पाणी पिताना असा एक नियम लक्षात ठेवा की पाणी घटाघटा प्यायचं नाहीये. पाणी जेवढं पाहिजे तेवढं प्या. पण ते अगदी घोट घोट घेऊन प्या.
6 / 6
किमान ३० ते ४० मिनिटे व्यायाम जरुर करा. व्यायाम केल्यामुळे एंडोर्फिन हार्मोन स्त्रवला जातो. तो तुम्हाला आनंदी, फ्रेश ठेवतो. तसेच मेंदूचे कार्य चांगले राहण्यासाठीही तो मदत करतो.
टॅग्स : फिटनेस टिप्सव्यायाममहिलापाठीचे दुखणे उपाय