1 / 9दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजय फक्त अभिनयासाठी किंवा डान्ससाठी नाही तर त्याच्या फिटनेससाठीही ओळखला जातो. वयाची पन्नाशी ओलांडली तरी विजयची ऊर्जा आणि शरीरयष्टी एखाद्या २५ वर्षांच्या तरुणाला लाजवेल अशीच आहे. अनेक कलाकार त्याच्या फिटनेसचे कौतुक करताना थकत नाही. पण हा 'सुपरफिट' लूक मिळवण्यासाठी विजय कोणत्याही महागड्या सप्लिमेंट्सवर अवलंबून नाही, तर त्याचे रहस्य त्याच्या शिस्तबद्ध जीवनशैलीत दडलेले आहे.(Thalapathy Vijay daily exercise routine)2 / 9थलपती विजयचा नेमका डाएट प्लॅन काय आहे आणि तो कोणत्या नियमांचे काटेकोरपणे पालन करतो. पाहूया त्याच्या फिटनेसचे ७ मंत्र (Celebrity weight loss and maintenance tips)3 / 9थलपती विजयच्या दिवसाची सुरुवात १० ते ४० मिनिटांच्या ब्रिस्क वॉकिंग किंवा धावण्याने होते. यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते आणि दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा मिळते. 4 / 9तसेच तो फंक्शनल स्ट्रेंथ ट्रेनिंगवर भर देतो. खूप जास्त वजन उचलण्याऐवजी मध्यम वजनासह जास्त रिपिटेशन्स (Repetitions) करतो, ज्यामुळे स्नायू मजबूत राहतात आणि दुखापतीचा धोका कमी होतो.5 / 9शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकातही तो घरच्या साध्या जेवणाला महत्त्व देतो. जे कोणत्याही फॅड डाएट किंवा क्रॅश डाएटच्या मागे न लागता पोषण देणारे पदार्थ असतात. 6 / 9तो साखर खाणे टाळतो किंवा खाताना नियंत्रण ठेवतो. जास्तीत जास्त नैसर्गिक फळे आणि हायड्रेशनसाठी ज्यूस पितो. 7 / 9विजय आपल्या जेवणात इडली, अंडी, फळे, भात, पालेभाज्या आणि चिकन-मासे यांचा समावेश करतो. तो कधीही स्वतःला उपाशी ठेवत नाही, पण किती प्रमाणात खावे (Portion control) याची शिस्त पाळतो.8 / 9ज्या दिवशी शूटिंगमुळे जिमला जाता येत नाही, त्या दिवशी विजय जास्तीत जास्त चालणे, स्ट्रेचिंग करणे किंवा सेटवर शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणे पसंत करतो. त्याच्यासाठी शरीराची हालचाल हीच व्यायामाची गुरुकिल्ली आहे.9 / 9विजयचा फिटनेस मंत्र अतिशय साधा आहे सिंपल आणि सेफ. तो फिटनेससाठी जास्त काळ ऊर्जा मिळेल अशा सवयींना महत्त्व देतो. हीच शिस्त त्याच्या राजकीय आणि वैयक्तिक आयुष्यातही दिसून येते.