1 / 8बॉलिवूडमधल्या अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या आजही त्यांच्या फिटनेससह ग्लॅमरसमुळे ओळखल्या जातात. त्यातीलच एक शिल्पा शेट्टी. वयाच्या पन्नाशीतही तिच्या फिगरमुळे अनेकांना घायाळ करते. वाढतं वय, सततचा ताण, शूटिगंचं व्यस्त वेळापत्रक असूनही तिचा चेहरा कायम तेजस्वी दिसतो. चेहऱ्यावर सुरकुत्या दिसत नाही. पण यामागे काही खास कारणं नाही तर तिने स्वत:ला लावलेली एक शिस्त आहे. (Shilpa Shetty fitness)2 / 8शिल्पा शेट्टी नेहमी सांगते की फिटनेस म्हणजे फक्त जिम नाही तर शरीर, मन आणि त्वचेची नियमितपणे काळजी घेणं. हाच सल्ला ती अनेक महिलांना कायम देत असते. (anti aging secrets)3 / 8शिल्पा शेट्टी क्रॅश डाएट किंवा कोणत्याही फॅन्सी फूड ट्रेंडला फॉलो करत नाही. तिने एका मुलाखतीत म्हटलं होतं फिट राहण्यासाठी काही घरगुती उपाय करते. 4 / 8तिच्या दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने करते. त्यात लिंबू मध मिसळून ते पाणी पिते. यामुळे शरीराला ऊर्जाही मिळते आणि फायदा देखील होतो. सकाळी ती कोरफडीचा रस, तुळशीची पाने, गूळ -आलं असं पदार्थ खाते ज्यामुळे पचन आणि रोगप्रतिकारशक्तीसाठी फायदेशीर मानलं जातं. 5 / 8सकाळच्या नाश्त्यामध्ये ती भरपूर प्रोटीन असणारे पदार्थ खाते. ज्यामुळे दिवसभर तिचे पोट भरलेले राहते. 6 / 8दुपारच्या जेवणात चिकन, मासे, कडधान्य किंवा ब्राउन राईस खाते. अनेकदा ती सलाद देखील खाते. ज्यामध्ये हिरव्या भाज्यांचा सगळ्यात जास्त समावेश असतो.7 / 8संध्याकाळच्या नाश्त्यात मखाणे, एवोकॉडो किंवा फ्रुट्स खाते. ज्यामुळे तिला ऊर्जा मिळते. 8 / 8रात्रीचे जेवण ७.३० ते ८ च्या दरम्यान करते. त्यात ती सूप, ग्रील्ड फूड किंवा मशरूम सारखे पदार्थ खाते. तसेच टोमॅटो, स्प्राउट्स, सफरचंद आणि बीट देखील खाते.