Join us

अगदीच किडकिडीत दिसता, वजन वाढत नाही? कॉन्स्टिपेशनही होते? प्या तांदळाचे पाणी, पाहा ४ मोठे फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2025 18:05 IST

1 / 7
कितीही खाल्ले तरी आपले वजन वाढत नाही, त्वचेवर सतत पिंपल्स येतात. अशावेळी किती महागतल्या उत्पादनांचा वापर केला तरी फायदा होत नाही. (Rice water benefits)
2 / 7
वजन वाढवण्यासाठी आपण पुरेसा व्यायाम करतो. डाएट प्लान करतो परंतु, कितीही काही केले तरी वजन काही वाढत नाही. त्यासाठी काही टिप्स फॉलो करा. (Drink rice water for weight gain)
3 / 7
तांदळाचे पाणी हे वजन वाढवण्यासह आरोग्याच्या इतर आजारांवर फायदेशीर आहे. भात खाल्ल्याने वजन वाढते असं म्हटलं जाते परंतु, याचे पाणी प्यायल्याने आरोग्याच्या समस्या कमी होऊ शकतात.
4 / 7
आपल्याला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर तांदळाचे पाणी पिऊ शकतो. रोज सकाळी रिकाम्या पोटी तांदळाचे पाणी प्यायल्याने पचन सुधारेल. तसेच गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळेल.
5 / 7
वजन वाढवण्यासाठी तांदळाचे पाणी पिऊ शकता. यामध्ये स्टार्चचे प्रमाण जास्त असते. तसेच कार्बोहायड्रेट्स असतात जे वजन वाढवण्यास फायदेशीर असतात.
6 / 7
तांदळाच्या पाण्यात कार्बोहायड्रेट्स असतात. जे आपल्या शरीराला ऊर्जा प्रदान करतात. रिकाम्या पोटी तांदळाचे पाणी प्यायल्याने शरीरात ऊर्जा टिकून राहाते. थकवा आणि अशक्तपणा दूर होतो.
7 / 7
त्वचेची चमक वाढवण्यासाठी रिकाम्या पोटी तांदळाचे पाणी प्यायल्याने त्वचेचा रंग सुधारतो. तसेच त्वचेवरील डाग कमी होतात. शरीरात साचलेले विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते.
टॅग्स : फिटनेस टिप्स