International yoga day 2025 : योगामुळे बदलून गेलं 'या' सेलिब्रिटींचं संपूर्ण आयुष्य! ते म्हणतात योगामुळेच आम्ही..
Updated:June 20, 2025 19:12 IST2025-06-20T17:42:48+5:302025-06-20T19:12:12+5:30

नियमितपणे योगा करण्यामुळे आयुष्यात खूप मोठा फरक पडलेले कित्येक लोक आपण आपल्या आजुबाजुला पाहातो. बॉलीवूड सेलिब्रिटीही त्याला अपवाद नाहीत.
काही बॉलीवूड सेलिब्रिटी नियमितपणे योगा करतात आणि त्यांच्या चाहत्यांनाही त्यासाठी प्रेरणा देतात. ते सेलिब्रिटी नेमके कोण आणि त्यांचे योगाविषयीचे मत काय आहे ते पाहूया...
मलायका अरोरा मागच्या कित्येक वर्षांपासून नियमितपणे योगा करते. त्यामुळेच वयाच्या पन्नाशीनंतरही ती एवढी फिट आहे. ती म्हणते “I don’t know where I would be without yoga”.. त्यामुळेच तिच्या चाहत्यांनाही ती नेहमीच योगा करण्याचा सल्ला देत असते.
नीना गुप्ताची लेक आणि सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मसाबा गुप्ताही योगाच्या बाबतीत कोणताही हलगर्जीपणा करत नाही. ती म्हणजे योगामुळेच मी खूप संतुलित, शांत आणि आनंदी राहू शकते.
समीरा रेड्डी ही देखील नियमितपणे योगा करणाऱ्या काही व्यक्तींपैकी एक आहे. योगा लहान वयातच मुलांना शिकवला पाहिजे आणि त्यांच्याकडून तो करून घेतला पाहिजे, असं ती नेहमीच म्हणते. “योगामुळे एक संतुलित आयुष्य मिळते.. Start yoga at any age and phase” असं ती तिच्या चाहत्यांना आवर्जून सांगत असते.
शिल्पा शेट्टी आणि तिचं योगाप्रेम सगळ्यांनाच माहिती आहे. योगाविषयी ती म्हणते “जेव्हा मी योगा करत असते तेव्हा माझं मन पुर्णपणे माझ्या नियंत्रणात असतं. आपल्या प्रत्येक भावना श्वासाशी निगडीत असतात. If you change the breath and its rhythm with awareness, you can change the emotion.”
रकुलप्रित सिंगही योगाच्या बाबतीत खूप काटेकोर आहे. म्हणूनच तर ती म्हणते “Yoga is a state of bliss”