रोज १०० पावलं 'या' पद्धतीने चाला, १० दिवसांत कमी होईल पाेटावरची चरबी, कंबरही बारीक होईल
Updated:February 17, 2026 09:40 IST2026-02-17T09:36:13+5:302026-02-17T09:40:02+5:30

बऱ्याच जणींची अशी तक्रार असते की त्यांचे हात- पाय बारीक असतात. पण पोटाचा घेर मात्र वाढलेला असतो. कंबरेवरही बरीच चरबी जमा झालेली असते.(how to reduce belly fat?)
अशावेळी सुटलेलं पोट कमी कसं करायचं हा प्रश्न पडतो. म्हणूनच पुढे सांगितलेले काही व्यायाम करून पाहा. काही दिवसांतच पोटावरची चरबी कमी झालेली जाणवेल.(simple exercises to get rid of belly fat)
पहिला व्यायाम म्हणजे ताडासन करा. साधारण एखादा मिनिट ताडासन करा आणि त्यानंतर मग त्याच अवस्थेत साधारण १०० पावलं चाला.
चालत असताना जर तुम्ही हिल वॉक म्हणजेच पायाची बोट उचलून केवळ टाचा टेकवून वॉकिंग करू शकलात तर अधिक चांगले. रात्री जेवणानंतर अशा पद्धतीने वॉकिंग केले तरी चालते.
याशिवाय प्लँक किंवा स्क्वॅट्स असे व्यायाम नियमितपणे केल्यास पोटावरची चरबी कमी होण्यास निश्चितच मदत होते.
नौकासन केल्यानेही पोटाच्या स्नायूंवर ताण येतो आणि पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होते.
याशिवाय सुटलेलं पोट कमी करण्यासाठी भुजंगासन करणेही खूप फायद्याचे ठरते.
सुर्यनमस्कार नियमितपणे केल्यास पोटावरची चरबी तर कमी होतेच, पण फिटनेस टिकविण्यासाठीही त्याचा उपयोग होतोच..