तिसावा वाढदिवस होताच तब्येतीची कुरकुर? थकवा - अंगदुखी? 'एवढे ' करा - राहाल फिट आणि फ्रेश
Updated:May 25, 2025 13:40 IST2025-05-25T13:33:21+5:302025-05-25T13:40:35+5:30
Health complaints as soon as you turn 30? Fatigue - body aches? Do 'this' - you will stay fit and fresh : या काही गोष्टी नियमित करा आरोग्य चांगले राहील. खास महिलांसाठी.

एकदा का वयाची तीशी गाठली की शरीरातील बदल जाणवायला लागतात. मग चाळीशीपर्यंत आणखी ताकद कमी होते. स्वत:ची काळजी स्वत:लाच घ्यावी लागते. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काही सवयी बदलाव्या लागतात. तसेच आहारात बदल करावे लागतात.
काही व्यायाम आहेत जे महिलांनी करायला हवेत. प्रत्येकीने दिवसातला एक तास स्वस्तासाठी द्यायलाच हवा. मुले ऑफीस घर सगळं सांभाळताना तारेवरची कसरत होते मात्र तो व्यायाम नाही. व्यायाम करायलाच हवा. पाहा कोणते व्यायाम आहेत जे करायलाही सोपे आहेत आणि फार फायद्याचे ठरतील.
काही योगासने करायला सोपी असतात आणि उपयुक्तही असतात. जसे की ताडासन वृक्षासन आणि त्रिकोणासन ही तीन आसने महिलांनी रोज करायला हवी. काही मिनिटांमध्ये उरकता येतील जास्त वेळही द्यावा लागणार नाही. लवचिकता वाढेल आणि अवयव मजबूत राहतील.
सगळ्यात सोपा साधा मात्र महत्त्वाचा व्यायाम म्हणजे चालायला जाणे. चालण्याची सवय कधीच मोडू नका. आजकाल गाडीने फिरायची सवय असल्याने आपण जवळपासही गाडीनेच जातो. भाजी आणायला जाताना ऑफीसला जाताना चालण्याचा अवलंब करायचा. काम आणि व्यायाम एकत्र होतो.
महिलांनी स्ट्रेचिंग करायला अजिबात विसरायचे नाही. महिलांचे शरीर वयानुसार आखडते त्यामुळे आळसही वाढतो. शरीर लवचिक राहावे यासाठी स्ट्रेचिंग करायचे आणि पायात येणारे गोळे वगैरे येणे बंद व्हावे यासाठीही हा व्यायाम करायला हवा.
कोणता खेळ खेळायला आवडतो? मग तो खेळणे सोडायचे नाही. बॅडमिंटन असेल किंवा इतर कोणता खेळ असेल खेळायची सवय ठेवा. महिलांना खेळण्यात संकोच वाटतो. मात्र तसे न वाटू देता खेळत जा. व्यायाम होतोच मात्र आनंदही मिळतो. ताणतणावातूनही आराम मिळतो. मन प्रसन्न राहते.
सायकल चालवता येत असेल तर रोज एक फेरी मारायला जा. मांड्या मोकळ्या होतात. तसेच पायांची ताकद वाढते. शरीराचा बॅलेंस जात नाही. लक्ष केंद्रित करण्यासाठी मदत होते.
सध्या झुंबा हा प्रकार जोरात आहे. व्यायामाचा तो नक्कीच उत्तम प्रकार आहे. ज्यांना नृत्याची आवड आहे त्यांच्यासाठी तर हा प्रकार अगदी परफेक्ट आहे. झुंबा क्लास लावू शकता. तेवढा वेळ जर नसेल तर तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओ पाहूनही झुंबाचे प्रकार शिकू शकता. तुमच्या वेळेनुसार घरी करा.