'६-६-६' चा नवा नियम; वजन कमी करून फिट राहण्याचा खास उपाय, पाहा तुमच्यासाठी किती फायदेशीर
Updated:November 19, 2024 18:58 IST2024-11-19T18:32:50+5:302024-11-19T18:58:25+5:30

वजन कमी करण्यासाठी किंवा फिट राहण्यासाठी अनेक जण नियमितपणे चालायला जातात. पण त्याचा आणखी फायदा तुमच्या शरीराला होण्यासाठी चालण्याचा व्यायाम करतानाच '६-६-६' चा नियम पाळा. (what is 6-6-6 rule for fitness?)
हा नियम नेमका कसा आहे, याविषयी तज्ज्ञांनी सांगितलेली माहिती हेल्थशॉट या साईटवर शेअर करण्यात आली आहे. यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की दररोज तुम्ही चालण्यासाठी सकाळी ६ किंवा संध्याकाळी ६ अशी कोणतीही वेळ निवडा.
याशिवाय चालायला सुरुवात करण्याच्या आधी ६ मिनिटांचे वार्मअप करा.
तसेच चालणे झाल्यानंतर ६ मिनिटांचे रिलॅक्सेशन जरूर घ्या. यामुळे संपूर्ण शरीरच रिलॅक्स व्हायला मदत होईल.
या तीन गोष्टींची पथ्ये पाळल्यामुळे चयापचय क्रिया अधिक चांगली होते. त्यामुळे शरीरावरची चरबी अधिक वेगात कमी होण्यास मदत होते.
तसेच चालण्याआधी केलेल्या वार्मअप आणि कूल डाऊन व्यायामांमुळे स्ट्रेस कमी होण्यासही मदत होते.