1 / 8आलिया भट, करिना कपूर यांची फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी यांनी अनेक शारिरीक, मानसिक त्रास कमी करण्यासाठी एक सोपा उपाय सुचवला आहे.2 / 8Leaning Back पोझिशन करण्याचे फायदे त्यांनी समजावून सांगितले आहेत. Leaning Back म्हणजे बेडवर पाठीवर झोपायचे आणि तुमचे डोके थोडे बेडच्या खाली, जमिनीच्या दिशेने असले पाहिजे, अशा अवस्थेत ठेवायचे. ही अवस्था काही सेकंद किंवा एखादा मिनिट टिकवून ठेवल्याने नेमके काय फायदे होतात, याविषयीची माहिती त्यांनी इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.3 / 8यामध्ये त्या सांगतात की दररोज रात्री झोपण्यापुर्वी काही सेकंद हा व्यायाम केल्यास स्ट्रेस कमी होण्यास मदत होते.4 / 8मान, खांदे, पाठ दुखत असेल तर हा व्यायाम केल्यामुळे आराम मिळतो. तिथले स्नायू रिलॅक्स होतात त्यामुळे दुखणं कमी होतं.5 / 8लॅपटॉप, कम्प्युटरसमोर तासनतास काम करून अंग आखडून जातं. अंग मोकळं करण्यासाठीही Leaning Back पोझिशन उपयुक्त ठरते.6 / 8अनेकांना खांदे झुकवून, पाठ वाकवून चालण्याची सवय असते. ती कमी करण्यासाठीही हा व्यायाम फायदेशीर ठरतो. 7 / 8हा व्यायाम केल्यामुळे डोक्याच्या भागाला चांगल्याप्रकारे रक्तपुरवठा होतो. त्यामुळे केस गळणं कमी होऊन केसांची चांगली वाढ होते.8 / 8या व्यायामामुळे चेहरादेखील चमकदार, तेजस्वी होण्यास मदत होते.