Join us   

आलिया भटशिवाय कोणालाच जमेना 'हा' व्यायाम, म्हणूनच त्याला म्हणतात 'आलिया पोझ'- बघा कशी करायची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2024 9:09 AM

1 / 7
आलिया भट आणि तिचं फिटनेस प्रेम तर सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणूनच तर राहाच्या जन्मानंतर अवघ्या एक महिन्यातच आलियाने पुन्हा एकदा व्यायामाला सुरुवात केली होती.
2 / 7
प्रेग्नन्सी, बाळंतपण यानंतर खूपच पटकन तिने व्यायाम सुरू केला आणि ती पुन्हा तिची पुर्वीची फिगर मिळविण्यात यशस्वी झाली. सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी यांच्याकडे आलिया फिटनेसचे धडे गिरवते.
3 / 7
अंशुका यांनी आलियाबाबतची एक पोस्ट नुकतीच सोशल मिडियावर शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी आलियाचा एक व्हिडिओ शेअर केला असून त्यात आलिया कपोतासन (Kapotasana) म्हणजेच Pigeon Pose करताना दिसते आहे.
4 / 7
याविषयी अंशुका यांनी लिहिलं आहे की २०२१ मध्ये त्यांनी आलियाला कपोतासन करायला सांगितलं होतं. आलियाने बराच प्रयत्न करून एका व्हिलच्या मदतीने ते अगदी उत्तमपणे केलं.
5 / 7
आलियाने केलेलं कपोतासन पाहून नंतर अनेकांनी ते करण्याचा प्रयत्न केला. पण आलियासारखं सफाईदारपणे ते कुणाला जमलं नाही. म्हणूनच त्यानंतर त्यांनी त्या आसनाला गमतीने 'आलिया पोझ' असं म्हणायला सुरुवात केली.
6 / 7
आता प्रेग्नन्सी, बाळंतपण यानंतर पुन्हा एकदा डिसेंबर- २३ मध्ये आलियाने हे आसन करून पाहिलं आणि त्यावेळीही तिला ते अगदी परफेक्ट जमलं. त्यामुळे आलियाच्या फिटनेस ट्रेनर तिच्यावर भारीच खुश असून त्यांनी त्याच आनंदात ही पोस्ट शेअर केली आहे.
7 / 7
कपोतासन हा खरोखरच एक अवघड व्यायाम प्रकार आहे. यामध्ये पाठीचा कणा पुर्णपणे मागच्या बाजुने वाकवला जातो. रोजची व्यायामाची सवय असल्याशिवाय कपोतासन जमणे अशक्य आहे.
टॅग्स : फिटनेस टिप्सव्यायामयोगासने प्रकार व फायदेआलिया भट