वर्कआऊट केल्यानंतर चुकूनही खाऊ नयेत ‘हे’ ७ पदार्थ, मेहनत जाते वाया-तब्येतही बिघडते...

Updated:February 11, 2025 20:33 IST2025-02-11T20:20:42+5:302025-02-11T20:33:32+5:30

Avoid These Post Workout Meals That Can Ruin Weight Loss Goal : 7 Foods to be Avoided after a Work out : 7 Worst Foods to Eat After Your Workout : 7 Foods You Should Never Eat After a Workout : भरपूर मेहनत करुन वर्कआऊट केल्यानंतर खाऊ नयेत असे पदार्थ, वजन कमी होण्याऐवजी वाढेल दुप्पट..

वर्कआऊट केल्यानंतर चुकूनही खाऊ नयेत ‘हे’ ७ पदार्थ, मेहनत जाते वाया-तब्येतही बिघडते...

वाढलेलं वजन कमी करण्यासाठी आपण ( 7 Worst Foods to Eat After Your Workout) अनेकदा खूप मेहनत घेतो. बरेचजण जिममध्ये जाऊन भरपूर वर्कआऊट करुन मोठ्या (7 Foods You Should Never Eat After a Workout) मुश्किलीने आपलं वजन कमी करतात. परंतु वर्कआऊट केल्यानंतर आपल्याला खूप भूक लागते. अशावेळी जर विचार न करता चुकीचे अन्नपदार्थ खाल्ले तर आपले वजन कमी होण्याऐवजी वाढण्याचीच अधिक जास्त शक्यता असते. यासाठीच वजन कमी करताना वर्कआऊट केल्यानंतर कोणते पदार्थ खाणे प्रामुख्याने खाणे टाळावे ते पाहूयात.

वर्कआऊट केल्यानंतर चुकूनही खाऊ नयेत ‘हे’ ७ पदार्थ, मेहनत जाते वाया-तब्येतही बिघडते...

केक, कुकीज, पांढरा ब्रेड, पाव यांसारख्या बेकरी प्रॉडक्ट्समध्ये रिफाइंड कार्ब्स फ्फर मोठ्या प्रमाणांत असतात. जे अगदी पटकन पचतात आणि आपल्याला इन्स्टंट एनर्जी मिळवून देतात. परंतु असे पदार्थ जास्त प्रमाणांत खाल्ल्याने आपल्या रक्तांतील साखरेचे प्रमाण वाढू शकते. यामुळे आपल्या शरीरात फार मोठ्या प्रमाणांत फॅट्स स्टोअर केले जातात, ज्यामुळे वजन कमी करण्याची प्रक्रिया मंदावते.

वर्कआऊट केल्यानंतर चुकूनही खाऊ नयेत ‘हे’ ७ पदार्थ, मेहनत जाते वाया-तब्येतही बिघडते...

वर्कआऊट केल्यानंतर प्रोसेस्ड फूड जसे की, पॅकिंग केलेले वेफर्स, चिप्सखाणे टाळावेत. या पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणांत मीठ आणि प्रिझर्व्हेटिव्ह्ज असतात. जे शरीरात पाणी टिकवून ठेवतात आणि यामुळे पोटफुगी होण्याची शक्यता असते.

वर्कआऊट केल्यानंतर चुकूनही खाऊ नयेत ‘हे’ ७ पदार्थ, मेहनत जाते वाया-तब्येतही बिघडते...

तृणधान्ये बहुतेकदा आरोग्यदायी म्हणून ओळखली जातात, परंतु त्यात लपलेली अतिरिक्त साखर आणि प्रक्रिया केलेले कार्बोहायड्रेट्स यामुळे तुमचे वजन वाढू शकते. तृणधान्ये शरीराला त्वरित ऊर्जा मिळवून देतात, परंतु रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढवू शकतात ज्यामुळे चरबी जाळण्याची प्रक्रिया मंदावते.

वर्कआऊट केल्यानंतर चुकूनही खाऊ नयेत ‘हे’ ७ पदार्थ, मेहनत जाते वाया-तब्येतही बिघडते...

फ्लेवर्ड दह्यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते, जे वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणू शकते. त्याऐवजी, साधे दही खा, ज्यामध्ये जास्त प्रथिने आणि कमी साखर असते. याचबरोबर, घरी तयार केलेले दही खाणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.

वर्कआऊट केल्यानंतर चुकूनही खाऊ नयेत ‘हे’ ७ पदार्थ, मेहनत जाते वाया-तब्येतही बिघडते...

एनर्जी ड्रिंक्समध्ये कॅफिन आणि साखरेचे प्रमाण जास्त असते, जे शरीराला डिहायड्रेट करू शकते. एनर्जी ड्रिंक्समुळे आपल्याला तात्पुरती ऊर्जा मिळते, परंतु दीर्घकाळ असे एनर्जी ड्रिंक्स पीत राहिल्यास ते वजन कमी करण्याच्या प्रक्रियेला हानी पोहोचवू शकतात. त्याऐवजी, लिंबू पाणी किंवा नारळ पाणी प्या.

वर्कआऊट केल्यानंतर चुकूनही खाऊ नयेत ‘हे’ ७ पदार्थ, मेहनत जाते वाया-तब्येतही बिघडते...

फ्रुट ज्यूस नैसर्गिकरित्या आरोग्यदायी वाटतात. परंतु त्यात नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते. फायबरच्या कमतरतेमुळे, ते रक्तातील साखरेचे प्रमाण लवकर वाढवू शकते, ज्यामुळे वजन कमी करण्याची प्रक्रिया मंदावते.

वर्कआऊट केल्यानंतर चुकूनही खाऊ नयेत ‘हे’ ७ पदार्थ, मेहनत जाते वाया-तब्येतही बिघडते...

वर्कआऊट केल्यानंतर नूडल्स, पिझ्झा, ब्रेड इत्यादी मैद्यापासून बनवलेले पदार्थ खाऊ नयेत. यामुळे चयापचय क्रियेचा वेग मंदावतो आणि चरबी वाढू शकते.

वर्कआऊट केल्यानंतर चुकूनही खाऊ नयेत ‘हे’ ७ पदार्थ, मेहनत जाते वाया-तब्येतही बिघडते...

वर्कआऊट केल्यानंतर आपण दही, ड्रायफ्रुटस, उकडलेली अंडी, प्रोटीन शेक, फळे, ओट्स आणि नट्स, नारळ पाणी यांसारखे पदार्थ खाऊ शकता. वर्कआऊट नंतर योग्य पोषक आहार घेणे महत्वाचे असते जेणेकरून वजन कमी करण्याची प्रक्रिया जलद होईल.