थंडीमुळे सर्दी- सायनसचा त्रास वाढला? ५ योगासनं करा- चोंदलेलं नाक होईल मोकळं
Updated:January 4, 2024 14:27 IST2024-01-04T13:39:59+5:302024-01-04T14:27:53+5:30

हिवाळा सुरू झाला की वाढत्या थंडीमुळे अनेकांना सायनसचा त्रास होतो. सर्दी- कफ असा त्रास होणारे लोक तर घरोघरी असतातच.
म्हणूनच वाढत्या थंडीमुळे वारंवार सर्दी होत असेल किंवा सायनसचा त्रास जाणवत असेल तर पुढे सांगितलेले व्यायाम काही दिवस नियमितपणे करून पाहा. यामुळे डोकं दुखणं, नाकातून- डोळ्यांतून पाणी येणं असा त्रास कमी झाल्यासारखा वाटेल, असं हिमालय सिद्ध अक्षर यांनी सांगितलं.
यापैकी सगळ्यात पहिलं आसन आहे सेतूबंधासन. या आसनामुळे डोक्याच्या भागात चांगला रक्तपुरवठा होतो आणि सायनसचा त्रास कमी होण्यास मदत होते.
दुसरं आहे भुजंगासन. १५ ते ३० सेकंदासाठी हे आसन करावं. आसनस्थितीत असताना श्वासोच्छवास हळूवार ठेवावा.
तिसरं आहे कॅट- काऊ पोज. यामध्ये कॅट पोझिशन असताना श्वास घ्या आणि काऊ पोझिशनमध्ये असताना श्वास सोडा. या आसनामध्ये ज्या पद्धतीने रक्तप्रवाह होतो, त्यामुळे सायनसचा त्रास कमी होण्यास मदत होते.
बालासन किंवा चाईल्डपोज केल्यामुळेही सर्दी- सायनसचा त्रास कमी हाेतो. २० ते ३० सेकंदासाठी हे आसन करावे.
अधोमुख श्वानासन केल्यामुळे डोक्याच्या भागाकडे चांगला रक्तपुरवठा होतो. त्यामुळेही डोकं मोकळं होऊन सायनसचा त्रास कमी होण्यास मदत होते.