पायऱ्या चढल्या, थोडं चाललं तरी धाप लागते ५ व्यायाम करा- फुफ्फुसांची ताकद वाढल्याने दम लागणार नाही

Updated:February 18, 2026 09:35 IST2026-02-18T09:33:14+5:302026-02-18T09:35:02+5:30

पायऱ्या चढल्या, थोडं चाललं तरी धाप लागते ५ व्यायाम करा- फुफ्फुसांची ताकद वाढल्याने दम लागणार नाही

वय वाढत जातं तसं चालताना धाप लागणं, थोड्या पायऱ्या चढल्या- उतरल्या की दम लागणं असा त्रास अनेकांना होतोच.. पण कमी वयात हा त्रास होणं बरं नाही.

पायऱ्या चढल्या, थोडं चाललं तरी धाप लागते ५ व्यायाम करा- फुफ्फुसांची ताकद वाढल्याने दम लागणार नाही

बऱ्याचदा तिशी- पस्तिशीतल्या लोकांनाही हा त्रास होताना आपण पाहातो. ज्यांना नियमितपणे चालण्याची किंवा व्यायामाची सवय नसते. त्यांना तर बराच दम लागतो. हा त्रास टाळायचा असेल तर फुफ्फुसांची ताकद वाढायला हवी. त्यासाठी नेमके कोणते व्यायाम करायचे ते पाहूया..

पायऱ्या चढल्या, थोडं चाललं तरी धाप लागते ५ व्यायाम करा- फुफ्फुसांची ताकद वाढल्याने दम लागणार नाही

पहिला व्यायाम आहे मत्स्यासन. हा व्यायाम केल्याने छातीचा भाग ताणला जातो. फुफ्फुसांची ताकद वाढण्यास मदत होते.

पायऱ्या चढल्या, थोडं चाललं तरी धाप लागते ५ व्यायाम करा- फुफ्फुसांची ताकद वाढल्याने दम लागणार नाही

दुसरा व्यायाम आहे गोमुखासन. गोमुखासन केल्याने फुफ्फुसांचा तर व्यायाम होतोच, पण आतड्यांचाही व्यायाम होतो. महिलांचे मासिक पाळीच्या काळातले त्रास कमी होण्यासाठीही गोमुखासन उपयोगी ठरते.

पायऱ्या चढल्या, थोडं चाललं तरी धाप लागते ५ व्यायाम करा- फुफ्फुसांची ताकद वाढल्याने दम लागणार नाही

अनुलोम- विलोम प्राणायाम नियमित केल्याने शरीरातल्या सर्व नाड्या मोकळ्या होतात. शिवाय श्वसनाचा त्रासही कमी होतो.

पायऱ्या चढल्या, थोडं चाललं तरी धाप लागते ५ व्यायाम करा- फुफ्फुसांची ताकद वाढल्याने दम लागणार नाही

श्वसनाशी संबंधित त्रास कमी करून फुफ्फुसांची ताकद वाढविण्यासाठी कपालभाती प्राणायाम करणेही खूप फायद्याचे ठरते.