सध्या जबरदस्त ट्रेण्डिंग असणारा ३×३ फिटनेस फंडा- वजन कमी होईल झरझर, करून पाहा
Updated:October 18, 2025 09:40 IST2025-10-18T09:35:43+5:302025-10-18T09:40:02+5:30

वजन कमी करण्यासाठी तुम्हीही प्रयत्न करत असाल तर ३×३ चा फिटनेस फंडा ट्राय करून पाहा. सध्या हा फॉर्म्युला सगळीकडेच खूप गाजतो आहे.
हा वेटलॉस फॉर्म्युला लोकांना खूप आवडत आहे कारण त्यामध्ये कोणतंही हेवी डाएटिंग किंवा कोणतंही हेवी वर्कआऊट सांगितलेलं नाही. अगदी साध्या सोप्या गोष्टी करून तुम्हाला फिट कसं राहता येईल, याविषयीची ही खास माहिती..
यामधला पहिला नियम असा की सकाळी १२ वाजेच्या आधी ३ हजार पावलं तुमची चालून व्हायला हवीत. म्हणजेच तुम्ही मॉर्निंग वॉकला गेलात तर हा आकडा सहज गाठता येतो. वॉकिंग केल्यामुळे व्यायाम तर होतोच, पण पचनक्रियाही चांगली होते. शरीर ॲक्टीव्ह राहण्यास मदत होते.
दिवसभरात तुम्ही जेवढं पाणी पित असाल त्याच्या एक तृतीयांश पाणी तुमचं दुपारी १२ वाजेपर्यंत पिऊन व्हायला हवं. यामुळे मेटाबॉलिझम आणि पचन हे दोन्ही उत्तम होतं. ते चांगलं झालं तर आपोआपच शरीरावर जास्तीची चरबी साठून राहात नाही.
तिसरा नियम म्हणजे ३० ग्रॅम एवढं प्रोटीन तुम्ही घ्यायलाच हवं. या ३ गोष्टी पाळल्या तर वजन नियंत्रित राहण्यास तर मदत होईलच पण फिटनेसही प्रचंड वाढेल.