1 / 8महिला दिनाचे कार्यक्रम हल्ली खूप ठिकाणी घेण्यात येतात. जवळपास सगळ्याच ऑफिसमध्ये तिथे काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांसाठी कार्यक्रम घेतला जातो. त्यांचं कौतुक केलं जातं. त्यामुळे महिलांच्या दृष्टीने हा दिवस खासच असतो. म्हणूनच या खास दिवशी तुम्हीही नेहमीपेक्षा वेगळं, स्पेशल दिसायला हवं.(formal look styling tips for women's day)2 / 8त्यासाठीच या काही खास टिप्स.. असा मस्त साडी लूक करून ऑफिसमध्ये जा. खूप स्टायलिश वाटेल. (Women's Day 2026 special formal look for office)3 / 8जर तुम्हाला ब्लेझर घालायची सवय असेल तर महिला दिनाच्या कार्यक्रमाला अशा पद्धतीने ब्लेझर घालून एकदम फॉर्मल लूकमध्ये जा. समोरच्यावर तुमची नक्कीच छाप पडेल.(office wear clothes for women)4 / 8एका चित्रपटातील दीपिका पदुकोनचा हा लूकही खूप गाजला होता. त्यानंतर प्लाझो, कुर्ता आणि त्यावर स्टोल असा लूक करून कित्येक जणी ऑफिसमध्ये जाताना दिसायच्या. असा लूकही तुम्ही महिला दिनानिमित्त पुन्हा एकदा करू शकता.5 / 8साडी नेसायला आवडत असेल तर कॉटन, लीनन अशा साड्या नेसायला प्राधान्य द्या. या साड्या नेहमीच छान वाटतात.6 / 8बारीक प्रिंटच्या आणि लाईट रंगाच्या शिफॉन साड्याही ऑफिसवेअर म्हणून शोभून दिसतात. या साडीवर असे छानसे दागिने घाला. आणखी मस्त दिसाल.7 / 8कमी वयाच्या युवतींना असे टॉप आणि त्याखाली फॉर्मल पॅण्ट असा लूकही छान वाटतो. असं काही ट्राय करून पाहा. एकदम वेगळ्या आणि स्टायलिश दिसाल. 8 / 8साडीमधला हा आणखी एक मस्त लूक पाहा.. असा लूक करून गेल्यास तुम्ही एकदम बॉस लेडी दिसाल यात वादच नाही.