Join us
Daily Top 2 Weekly Top 5

Women's Day 2026 : स्पेशल डेट प्लान करताय? जुने टिपिकल गाऊन विसरा, घ्या १० सुंदर मॅक्सी ड्रेस- दिसा स्टायलिश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2026 13:00 IST

1 / 9
महिला दिनानिमित्त आपले फ्रेंड्स, पार्टनर किंवा ऑफिसमध्ये पार्टी असते. या दिवशी अनेक ठिकाणी डेट नाईटचा प्लान देखील केला जातो. पण नेमकं यावेळी काय घालावं असा प्रश्न अनेकांना पडतो. पार्टीमध्ये तेच ते जड गाऊन किंवा टिपिकल ड्रेस घालून कंटाळा आला असेल तर यंदा काहीतरी वेगळं, सुटसुटीत कपडे निवडू शकता. (Date night outfits)
2 / 9
नेहमीचे टिपिकल गाऊन घालण्यापेक्षा पार्टीसाठी १० सुंदर मॅक्सी ड्रेसचे पर्याय पाहूया. (Maxi dresses for women)
3 / 9
सॅटिन स्लिप मॅक्सी हा ड्रेस दिसायला अतिशय रॉयल आणि मिनिमलिस्टिक असतो. वाईन रेड किंवा एमरल्ड ग्रीन रंगात हा ड्रेस डेट नाईटसाठी परफेक्ट आहे.
4 / 9
कट-आउट मॅक्सी ड्रेस हा कमरेच्या बाजूला किंवा पाठीवर कट असतो. हे डिझाईन असलेले ड्रेसेस सध्या खूप लोकप्रिय आहेत. यात आपल्याला बोल्ड आणि मॉडर्न लूक मिळेल.
5 / 9
टाय-डाय सिल्क मॅक्सी ड्रेस पुन्हा एकदा फॅशन ट्रेंडमध्ये आहे. पेस्टल रंगातील सिल्क मॅक्सी ड्रेस रात्रीच्या वेळी उठून दिसतात.
6 / 9
आपल्याला थोडा फेमिनाईन लूक हवा असेल तर शिफॉन कापडातील फ्लोरल मॅक्सी ड्रेस निवडा. यात हाय-स्लिट फ्लोरल मॅक्सी ड्रेस पार्टीसाठी चांगला पर्याय आहे.
7 / 9
ऑफ-शोल्डर रफल ड्रेसमध्ये आपला लूक अधिक खुलून दिसेल. मानेच्या आणि खांद्याच्या भागात रफल्स असलेला ड्रेस आपल्या परीसारखा लूक देईल.
8 / 9
पब किंवा नाईट क्लबमध्ये जात असाल. तर सिल्वर किंवा गोल्ड मेटॅलिक फिनिश असलेला मॅक्सी ड्रेस निवडा.
9 / 9
बॅकलेस हॉल्टर नेक हा क्लासिक स्टाईलचा ड्रेस आहे. पाठीवरची डिझाईन आपल्या व्यक्तिमत्वात भर घालते.
टॅग्स : फॅशनजागतिक महिला दिनमहिला