Join us

छत्री की रेनकोट तुम्ही काय वापरता? पावसात भिजायचे नसेल तर हे घ्या काही भन्नाट पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2025 10:02 IST

1 / 9
पावसाळा सुरू झाला की काही वस्तूंचा वापर रोजच्या रोज केला जातो. तसे की छत्री, रेनकोट, पावसाळी चपला आणि आणखी काही गोष्टी. वर्षभर माळ्यावर पडलेल्या या वस्तू आता खाली उतरवायच्या आणि पावसाची वाट पाहायची.
2 / 9
रोज वापरायला लागणाऱ्या वस्तू चांगल्या सुंदर असतील तर दिसायलाही छान वाटतात. साध्या छत्रीतही अनेक प्रकार असतात. लहान मुलांसाठी तसेच मोठ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे रेनकोट मिळतात. पाहा कोणत्या प्रकारची छत्री तुम्हाला आवडेल. छत्री वापरणार का रेनकोट?
3 / 9
ऑफीसला घेऊन जाण्यासाठी फोल्डींची लहान छत्री अगदी योग्य आहे. लहान असल्याने पर्समध्ये ही छत्री आरामात मावते. त्याला प्लास्टिक लावता येते. सांभाळायला फार सोपी असते.
4 / 9
जरा ओल्ड लूक देणारी लांब दांड्याची ही छत्री आपले आजोबा नक्की वापरतात. आकाराला मोठी असते टेकवून चालता येते. तसेच अजिबात भिजायला होत नाही.
5 / 9
पोलका डॉट पॅटर्नची छत्री फार जुनी आहे. दिसायला अगदी छान असते त्यात विविध आकार तसेच मापाच्या छत्री असतात.
6 / 9
लहान मुलांसाठी रेनबो छत्री नक्की घ्या. त्यांना अशी छत्री फार आवडेल. लहानपणी तुम्हीही ही छत्री वापरलीच असेल शिवाय त्याचे बटण अगदी हलके असते त्यामुळे मुलांना छत्री उघडताना त्रास होत नाही.
7 / 9
काहींना छत्रीपेक्षा रेनकोट जास्त आवडतो. रेनकोट काढायला घालायला जरा कष्ट पडले तरी रेनकोट घातल्यावर सामान व शरीरी काहीच भिजत नाही.
8 / 9
पातळ पारदर्शक असा हा रेनकोट अगदी हलका असतो. वापरायला सोपा असतो. दिसायलाही चांगला असतो. त्यात भिजायला होत नाही.
9 / 9
महिलांसाठी नाडी असलेला असा हा रेनकोट मिळतो. आजकाल ट्रेंडींगही आहे. पोटाशी बांधल्यावर वाऱ्याने तो उडतही नाही. तसेच त्याला चांगला लूकही येतो.
टॅग्स : खरेदीपाऊसमहिला