1 / 7प्रत्येकाच्या शरीराची ठेवण वेगळी असते. त्यामुळे प्रत्येकाच्या शरीरावर सुंदर दिसणारे कपड्यांचे पॅटर्नही वेगवेगळे असतात. अनेक महिलांच्या मांड्या जाड असतात. त्यात लाज वाटण्याची काहीच गरज नसते. खरे तर योग्य प्रकारचा पोशाख केल्यास शरीर आणखी सुंदर दिसते. 2 / 7मांड्या जाड असतील तर हाय वेस्ट स्ट्रेट पॅण्ट्स फार सुंदर दिसतील. 3 / 7फ्लेअर्ड ट्राऊझर वापरा. पायांना आराम मिळतो. तसेच त्वचा ओढली जात नाही.4 / 7प्लाझो हा प्रकार तसाही फार ट्रेंडींग आहे. कुर्ता किंवा शॉर्ट कुर्तीखाली नक्की घाला. 5 / 7ए-लाइन स्कर्ट्स कंबर आणि हिप्सना सुंदर आकार देतात. शरीर मस्त आकर्षक दिसते. 6 / 7कुलॉट्स म्हणजेच गुडघ्यापर्यंत किंवा थोड्या लांब असणाऱ्या रुंद शॉर्ट्ससारख्या पँट्स. थिक थाईज लपवून फॅशनेबल लूक देतात.7 / 7स्ट्रेचेबल जॉगर पँण्ट्स वापरा. आरामदायी, सॉफ्ट फॅब्रिकमुळे मांडीभोवती घट्ट वाटत नाही. कॅज्युअल लूकसाठी उत्तम पर्याय.