Join us

सोन्याचांदीच्या महागड्या दागिन्यांपेक्षा २०० रुपयांचे टेराकोटा दागिने खाऊन जातील भाव! स्टायलिश, ट्रेण्डी १० डिझाईन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2025 18:00 IST

1 / 10
सोन्याचांदीच्या दागिन्यांच्या किमती आता आकाशाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना त्या अजिबातच परवडणाऱ्या नाहीत.मग अशावेळी उगाच त्या दागिन्यांचा अट्टाहास करण्यापेक्षा काही कार्यक्रमासांठी तुम्ही टेराकोटा दागिन्यांचा पर्यायही निवडू शकता.(terracotta jewellery designs)
2 / 10
हे दागिने अगदी १५० ते २०० रुपयांपासून सुरू होतात आणि ते अंगावर खूप छान दिसतात.(latest patterns of terracotta jewellery)
3 / 10
टेराकोटा दागिन्यांची खासियत अशी की तुम्ही ते वेस्टर्न कपड्यांप्रमाणेच साडीवरही घालू शकता. दोन्ही प्रकारच्या कपड्यांवर ते तेवढाच सुंदर आणि ट्रेण्डी लूक देतात.
4 / 10
कॉटन अणि लीननच्या साड्यांवर तर हमखास टेराकोटा दागिने घालायलाच प्राधान्य द्या. कारण त्या साड्यांवर टेराकोटा दागिने खूप कमाल दिसतात.
5 / 10
या दागिन्यांमध्ये तुम्हाला पाहिजे तेवढे प्रचंड वेगवेगळे प्रकार मिळतात. अशा पद्धतीचं मोठं, ठसठशीत पेंडंटही तुम्ही घेऊ शकता...
6 / 10
किंवा मग मोठे दागिने आवडत नसतील तर असे नाजूक सुंदर गळ्यातलेही मिळतात.
7 / 10
गळ्यातलं न घालता फक्त असे मोठे लांब कानातले घातले तरी ते खूप आकर्षक वाटतं.
8 / 10
या दागिन्यांची खासियत अशी की ते वजनाने खूप हलके असतात. त्यामुळे ते तुम्ही कितीही वेळ अंगावर ठेवले तरी त्याचं ओझं अजिबात जाणवत नाही.
9 / 10
शिवाय हे दागिने स्वच्छ करणं आणि त्यांना मेंटेन ठेवणंही सोपं आहे.
10 / 10
साडीवर असं एखादं नाजूक, लांब टेराकोटा प्रकारातलं गळ्यातलं घातलं तरी नक्कीच चारचौघीत उठून दिसाल.
टॅग्स : फॅशनदागिनेसोनंस्टायलिंग टिप्स