लग्नात डिझायनर महागडे लेहेंगे टाळणाऱ्या ७ बॉलीवूड अभिनेत्री, पाहा नवरी अशी नटली की..

Published:April 6, 2024 05:26 PM2024-04-06T17:26:59+5:302024-04-06T17:31:35+5:30

लग्नात डिझायनर महागडे लेहेंगे टाळणाऱ्या ७ बॉलीवूड अभिनेत्री, पाहा नवरी अशी नटली की..

बॉलीवूड अभिनेत्री त्यांच्या स्वत:च्या लग्नात लेहेंगा घालणारच असं आपल्याला वाटतं. आजवर आपण अशाच रुपात अनेक बॉलीवूड अभिनेत्री पाहात आलो आहोत. पण काही जणी मात्र याला अपवाद ठरल्या आहेत.

लग्नात डिझायनर महागडे लेहेंगे टाळणाऱ्या ७ बॉलीवूड अभिनेत्री, पाहा नवरी अशी नटली की..

नुकतंच तापसी पन्नूचं लग्न झालं. या लग्नाचे काही फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले असून लग्नासाठी तापसीने सलवार- सूटची निवड केली होती. सलवार सूट आणि गॉगल अशा एकदम हटके स्टाईलमध्ये ती दिसून आली.

लग्नात डिझायनर महागडे लेहेंगे टाळणाऱ्या ७ बॉलीवूड अभिनेत्री, पाहा नवरी अशी नटली की..

आलिया भटचा तिच्या लग्नातला लूकही खूप गाजला होता. तिने तिच्या लग्नासाठी मोतिया रंगाच्या कोणतंही हेवी डिझाईन नसणाऱ्या सुंदर साडीची निवड केली होती.

लग्नात डिझायनर महागडे लेहेंगे टाळणाऱ्या ७ बॉलीवूड अभिनेत्री, पाहा नवरी अशी नटली की..

करिना कपूरने तिच्या लग्नात शरारा आणि त्यावर लाँग कुर्ता अशा पद्धतीचे कपडे घातले होते.

लग्नात डिझायनर महागडे लेहेंगे टाळणाऱ्या ७ बॉलीवूड अभिनेत्री, पाहा नवरी अशी नटली की..

अजय देवगण आणि काजोलचं लग्न महाराष्ट्रीयन पद्धतीने झालं होतं. त्यामुळे काजोलने लग्नात ९ वार साडी नेसली होती.

लग्नात डिझायनर महागडे लेहेंगे टाळणाऱ्या ७ बॉलीवूड अभिनेत्री, पाहा नवरी अशी नटली की..

ऐश्वर्या रायनेही तिच्या लग्नात लेहेंगा घातला नव्हता. त्याऐवजी तिने कांजीवरम साडी नेसण्यास प्राधान्य दिले होते. तिची ती साडी डिझायनर नीता लुल्ला यांनी डिझाईन केली होती आणि तिच्या साडीला स्वरोस्कीचे हिरे जडवलेले होते.

लग्नात डिझायनर महागडे लेहेंगे टाळणाऱ्या ७ बॉलीवूड अभिनेत्री, पाहा नवरी अशी नटली की..

जेनेलिया डिसुझा हिने तिच्या लग्नात भरगच्च डिझाईन असणारी लाल साडी नेसली होती.

लग्नात डिझायनर महागडे लेहेंगे टाळणाऱ्या ७ बॉलीवूड अभिनेत्री, पाहा नवरी अशी नटली की..

शिल्पा शेट्टीनेही लेहेंग्याऐवजी साडी नेसण्यालाच प्राधान्य दिले होते.