1 / 9बॉलिवूडचा बादशाह अर्थात शाहरूख खानची लेक सुहाना खान सगळ्यांनाच ठाऊक आहे. सध्या ती विदेशात शिक्षण घेत आहे. मात्र, तिचे लक्ष्य अभिनयावर आहे. सुहाना सोशल मिडीयावर प्रचंड सक्रीय असते. तिची फॅन फॉलोअर्सची यादी कमालीची आहे. 2 / 9'द आर्चीज' या चित्रपटातून तिने इंडस्ट्रीत पहिले पाऊल टाकले आहे. चित्रपटातील तिचा लूक इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला होता.3 / 9सध्या सुहानाचा एक फोटो सोशल मिडीयावर चर्चेत आला आहे. तिचा हा व्हायरल फोटो, तिची चुलत बहिण आलिया छिब्बाने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 4 / 9या व्हायरल फोटोमध्ये सुहानाने पेस्टल कलरचा टर्टलनेक टॉप परिधान केला आहे. त्यावर तिने जॅकेट कॅरी केला आहे. 5 / 9सुहाना या फोटोमध्ये सोज्वळ आणि सुंदर दिसत आहे. तिच्या हातात फुलांचा पुष्पगुच्छ देखील दिसत आहे.6 / 9तिने या लुकमध्ये नो मेकअप लूक कॅरी केला आहे. यासह कानात गोल्डन रंगाचे हूप्स इयररिंग्स परिधान केले आहे.7 / 9सुहानाने या लुकमध्ये केसांची हेअरस्टाईल सिंपल ठेवली आहे. तिने केसांचा बन बांधला आहे. 8 / 9सुहानाला अधिक मेकअप आवडत नाही. शाहरुखने एका मुलाखतीत सांगितले होते की, ती घरात सुद्धा साधी सिंपल पजामा लुकमध्ये राहते. 9 / 9याबाबतीत ती आपली आई गौरी खानवर गेली आहे. गौरीला देखील कम्फर्ट कपडे परिधान करायला आवडते. ती देखील सिंपल लुकमध्ये राहते.