Join us
Daily Top 2 Weekly Top 5

रेखाची 'एव्हरग्रीन' स्टाईल ते आलियाचा 'मॉडर्न' लूक; बॉलिवूड सुंदरींना वेड लावणाऱ्या या ५ साड्या पाहिल्या का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2026 22:00 IST

1 / 9
बॉलिवूडमध्ये फॅशन ट्रेंड्स सतत बदलत असले तरी साडीचे आकर्षण कधीच कमी होताना दिसत नाही. दिग्गज अभिनेत्री रेखा यांच्या क्लासिक साड्यांपासून ते आजच्या आलिया भट्टसारख्या यंग जनरेशन स्टार्सपर्यंत, अनेक अभिनेत्रींनी वेगवेगळ्या प्रकारच्या आणि फॅब्रिकच्या साड्यांना पुन्हा एकदा ग्लॅमरस ओळख मिळवून दिली आहे(Silk to cotton these 5 sarees are every bollywood beauty first choice).
2 / 9
कधी रेड कार्पेटवर, कधी लग्नसमारंभात तर कधी साध्या कार्यक्रमांतही या अभिनेत्रींनी साडीतील एलिगन्स आणि ग्रेस अत्यंत अभिमानाने मिरवला आहे. खास बाब म्हणजे या साड्यांचे फॅब्रिक, टेक्सचर आणि स्टाईल इतकी लोकप्रिय झाली आहे की त्या महिलांमध्येही ट्रेंड बनल्या आहेत.
3 / 9
काळ बदलला, फॅशन बदलली, पण काही फॅब्रिक्स किंवा साड्यांचे प्रकार असे आहेत (saree fabrics loved by Bollywood stars) ज्यांची भुरळ पिढ्यानपिढ्या बॉलिवूड अभिनेत्रींना देखील पडत आली आहे. रेखा यांच्यापासून ते अगदी आलियापर्यंत, या टॉप अभिनेत्रींच्या वॉर्डरोबमध्ये हमखास असणाऱ्या ५ खास प्रकारच्या साड्यांविषयी नेमक्या कोणत्या ते पाहूयात...ज्या फक्त फॅशनच नाही तर भारतीय परंपरेचा एक अमूल्य वारसा आहेत.
4 / 9
रेड कार्पेट असो किंवा सण-समारंभ, या ५ खास प्रकारच्या किंवा फॅब्रिक्सच्या साड्यांनी बॉलिवूड अभिनेत्रींना इतकी भुरळ पाडली आहे की त्या आजही फॅशनप्रेमींमध्ये ट्रेंड ठरत आहेत. कोणत्या आहेत त्या साड्या आणि त्यांचं खास वैशिष्ट्य काय ते पाहूयात...
5 / 9
चमकदार फिनिश आणि आकर्षक, चमचमती असलेली शिमरी साडी बॉलिवूड अभिनेत्रींची कायमची फेवरिट ठरली आहे. लाईटवेट फॅब्रिक, मेटॅलिक शेड्स आणि मॉडर्न डिझाइनमुळे या साड्या पार्टी, अवॉर्ड नाईट्स आणि रिसेप्शनसाठी परफेक्ट मानल्या जातात. आजच्या काळातील जान्हवी कपूर, कियारा अडवाणी आणि मलायका अरोरा यांसारख्या अभिनेत्रींनी या साड्यांचा एक अनोखा हटके ट्रेंड केला आहे. या साड्या रात्रीच्या प्रकाशामध्ये अप्रतिम चमकतात. जर तुम्हाला एखाद्या पार्टीत किंवा लग्नाच्या रिसेप्शनमध्ये 'सेंटर ऑफ अट्रॅक्शन' बनायचे असेल, तर शिमरी साडी हा सर्वोत्तम पर्याय आहे.यात संपूर्ण साडीवर बारीक टिकल्या (Sequins) किंवा मेटॅलिक धाग्यांचे काम असते. हे फॅब्रिक शरीराच्या ठेवणीनुसार चपखल बसते, ज्यामुळे तुम्हाला एक परफेक्ट 'बोल्ड आणि ब्युटीफुल' लूक मिळतो. शिमरी साडी स्वतःच खूप चमकणारी असल्याने, त्यावर दागिने कमीत कमी ठेवावेत. केवळ एक हेवी इअररिंग्स किंवा स्टायलिश क्लच देखील तुमचा लूक पूर्ण करण्यासाठी पुरेसा ठरतो.
6 / 9
सध्या बॉलिवूडमध्ये जर कोणत्या साडीची सर्वात जास्त चर्चा असेल, तर ती म्हणजे 'ऑर्गेंजा'. आलिया भट्ट पासून ते कतरिना कैफ पर्यंत प्रत्येक अभिनेत्रीच्या वॉर्डरोबमध्ये या साडीने हक्काचे स्थान मिळवले आहे. पारंपारिक आणि आधुनिक फॅशनचा एक सुंदर मेळ म्हणून या साडीकडे पाहिले जाते. फ्लोरल प्रिंट्स, पेस्टल शेड्स किंवा हलकी एम्ब्रॉयडरी असलेल्या ऑर्गेंजा साड्या डे फंक्शन्स, लग्नसमारंभ आणि सणांसाठी अत्यंत शोभून दिसतात. साधा ब्लाऊज, सॉफ्ट मेकअप आणि मिनिमल दागिन्यांसोबत ऑर्गेंजा साडी नेसली तर लूक अतिशय क्लासी दिसतो. हे कापड अतिशय पातळ, पारदर्शक आणि वजनाला हलके असते. ऑर्गेंजा साडी थोडी फुगीर राहत असल्याने, ती नेसल्यावर एक राजेशाही आणि फेमिनाईन लूक मिळतो.
7 / 9
यश चोप्रा यांच्या चित्रपटांतील नायिकांपासून ते आजच्या पिढीतील आलिया भट्ट पर्यंत, शिफॉन साडीने प्रत्येक काळात आपले वेगळेपण टिकवून ठेवले आहे. श्रीदेवी यांनी 'चांदनी' चित्रपटात नेसलेली पिवळी शिफॉन साडी असो किंवा 'रॉकी और रानी...' मध्ये आलियाने नेसलेली 'कलर ब्लॉक' शिफॉन, हा प्रकार नेहमीच चर्चेत राहिला आहे. शिफॉन साडी ही शरीराच्या आकाराला उत्तमरीत्या हायलाईट करते. यामुळे अभिनेत्रींना एक अतिशय मोहक आणि सुटसुटीत लूक मिळतो. ऑफिस पार्टी, कॉकटेल इव्हेंट किंवा सण-समारंभासाठी शिफॉन साडी उत्तम पर्याय ठरते. साध्या प्रिंटेड शिफॉन साड्यांपासून ते हेवी बॉर्डर असलेल्या साड्यांपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत. शिफॉन साडीसोबत 'पर्ल ज्वेलरी' किंवा नाजूक हिऱ्यांचे नेकलेस अतिशय क्लासी दिसतात.
8 / 9
बॉलिवूडमध्ये सिल्क साडी आणि रेखा हे एक अतूट समीकरण आहे. रेखा यांच्याप्रमाणेच विद्या बालन आणि दीपिका पदुकोण यांनीही सिल्क साड्यांना जागतिक स्तरावर 'स्टाईल स्टेटमेंट' बनवले आहे. दीपिका पदुकोणपासून ते कंगना रणौतपर्यंत अनेक अभिनेत्रींनी पारंपारिक सिल्क साड्यांना आधुनिक ट्विस्ट देऊन रेड कार्पेटवर मिरवले आहे. रेशमी धाग्यांमुळे या साडीला एक वेगळीच नैसर्गिक चकाकी असते. यात कांजीवरम, बनारसी, पैठणी, चंदेरी आणि गडवाल असे अनेक प्रकार येतात. सिल्क साडीवर टेम्पल ज्वेलरी किंवा सोन्याचे हेव्ही दागिने अतिशय सुंदर दिसतात. केसांचा आंबाडा घालून त्यात माळलेला मोगऱ्याचा गजरा तुमचा 'ट्रेडिशनल लूक' पूर्ण करतो.
9 / 9
हलकी, पारदर्शक टेक्सचर आणि नाजूक झरीकाम यासाठी ओळखली जाणारी चंदेरी साडी ही परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम आहे. मध्यप्रदेशातील चंदेरी शहरातून आलेली ही साडी रेखाच्या क्लासिक स्टाईलपासून ते आलिया भट्टच्या सॉफ्ट, एलिगंट लूकपर्यंत अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना भुरळ घालते. सण-समारंभ, पूजा किंवा लग्नासाठी चंदेरी साडी अतिशय शोभून दिसते. यावर असलेली 'नाजूक बुटी' आणि सोन्या-चांदीच्या जरिची बॉर्डर हे या साडीचे मुख्य आकर्षण असते.
टॅग्स : फॅशनस्टायलिंग टिप्ससाडी नेसणेबॉलिवूड