Join us

श्रावण स्पेशल : मंगळागौर-राखीपौर्णिमा की हळदीकुंकू, नेसा ‘या’ ५ साड्या, मैत्रिणी विचारतील कुठून घेतली साडी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2025 19:16 IST

1 / 8
श्रावण महिना म्हणजे खास सणावारांचा महिना... श्रावणात वेगवेगळ्या प्रकारचे सण, उत्सव (Simple saree looks for Shravan festival) आपण फार मोठ्या आनंदाने आणि हौसेने साजरे करतो. सणवार असेल तर महिला (Shravan Special Saree Look) देखील अगदी आवडीने सण साजरा करण्यासाठी नथ - साडीपासून पारंपरिक वेशभूषा करतात. अशावेळी वर्षभर कपाटांत ठेवलेल्या ठेवणीतल्या साड्या बाहेर काढल्या जातात.
2 / 8
रोज वेगवेगळ्या साड्या नेसणं शक्य नसलं, तरी आपल्या वॉर्डरोबमध्ये (Best saree styling ideas for Shravan) काही खास आणि कॉमन साड्या असणं आवश्यक आहे, ज्या कोणत्याही सणवाराला किंवा खास प्रसंगांना सहज नेसता येतील आणि तितक्याच शोभून देखील दिसतील.
3 / 8
श्रावणात सणावारांसाठी खास ५ कॉमन पण स्टायलिश साड्यांचे प्रकार कोणते जे आपल्या वॉर्डरोबमध्ये असणे गरजेचे असते ते पाहूयात.
4 / 8
कांजीवरम सिल्क साडी हा भारतीय साड्यांमधील एक राजेशाही प्रकार मानला जातो. खासकरून सण, विवाह किंवा विशेष प्रसंगासाठी महिलांच्या वॉर्डरोबमधील 'must-have' साडी म्हणजेच हीच! हेवी बॉर्डर, सोनेरी झरझरीचा पल्लू आणि पारंपरिक मंदिर, मोर, पान-पट्टी यांसारखी डिझाईन ही या साडीची खास ओळख आहे. नारळी पौर्णिमा, मंगळागौर किंवा गौरीपूजनासाठी ही साडी तुम्हांला परफेक्ट पारंपरिक लूक देईल.
5 / 8
बनारसी सिल्क साडी म्हणजेच साडीचा एक असा प्रकार जो पारंपरिकतेला रॉयल टच देतो. मोर, कमळ, बेलबुट्या, झाडं आणि मंदिर यांसारख्या पारंपरिक आकृत्यांमधून या साड्यांवर कला साकारली जाते. श्रावणातील हरितालिका, रक्षाबंधन, पूजाविधी किंवा मंगळागौरसाठी जर तुम्हांला चारचौघीत उठून दिसायचं असेल, तर बनारसी सिल्क साडी तुमच्यासाठी परफेक्ट पर्याय ठरू शकते.
6 / 8
पाटण पटोला साडी ही भारतातील सर्वात दुर्मिळ, कलात्मक आणि प्रतिष्ठित अशा साड्यांपैकी एक मानली जाते. तिची खासियत म्हणजे तिचं डबल इकतच विणकाम आणि दोन्ही बाजूंनी सारखं दिसणारं जटिल पण कलात्मक डिझाइन. श्रावणातील सण-समारंभ, हरितालिका किंवा पारंपरिक कार्यक्रमासाठी ही साडी नेसल्यास तुमचा लुक दुसऱ्यांपेक्षा वेगळा, उठून दिसणारा आणि अतिशय रॉयल वाटेल.
7 / 8
पैठणी साडी ही महाराष्ट्राची शान आणि अभिमान मानली जाते. पारंपरिक मराठी साजशृंगारात पैठणी साडीचं स्थान विषेश आहे. खासकरून सण, मंगळागौर, हरितालिका, गौरी-गणपती, आणि विवाह सोहळ्यांसाठी पैठणी साडी हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. श्रावणातल्या मंगळागौर, हरितालिका किंवा गौरी पूजनासाठी जर पारंपरिक मराठमोळा लुक हवा असेल, तर पैठणी साडी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. शुद्ध रेशीम आणि जरीच्या धाग्यांपासून तयार केली जाणारी पैठणी साडी म्हणजे श्रावणातील अस्सल मराठमोळं सौंदर्य.
8 / 8
टिश्यू सिल्क साडी ही एलिगंट साडी आहे जी पारंपरिकतेला आधुनिक लुक देते. या प्रकारच्या साड्यांमध्ये कापडाला एक हलकासा चमकदारपणा व शिमरी लुक असतो, ज्यामुळे ती साडी अतिशय रॉयल आणि डिझायनर दिसते. श्रावणातील हळद-कुंकू, भजन-कीर्तन, सोसायटी फंक्शन्स किंवा खास संध्याकाळच्या पूजा-विधी कार्यक्रमासाठी टिश्यू सिल्क साडी परफेक्ट चॉईस ठरतो. या साड्या अगदी हलक्या असतात त्यामुळे नेसायला देखील खूपच सोयीच्या असतात म्हणून कमी मेहनतीत जास्त उठून दिसणारा लुक हवा असेल, तर ही साडी नक्कीच बेस्ट आहे.
टॅग्स : फॅशनस्टायलिंग टिप्सश्रावण स्पेशलसाडी नेसणे