1 / 7सणसमारंभ सुरु झाले की आपल्याला नवीन कपडे हवे असतात. मग कपाटातल्या ढीगभर साड्यांचं काय करावं असा प्रश्न देखील पडतो. आपल्यापैकी अनेकांच्या कपाटात काठापदराच्या साड्या हमखास असतील. पण त्या खूप भारी असल्यामुळे आपण शक्यतो कमी प्रमाणात नेस असू. (Katha Paddar saree kurti)2 / 7सणवारामध्ये स्टायलिश आणि ब्यूटीफूल दिसायचे असेल तर काठापदराच्या साडीपासून या पद्धतीचे खास ड्रेस शिवा. इतके सुंदर दिसाल की विकत ड्रेस घेण्याची गरज पडणार नाही. (stylish kurti from old saree)3 / 7आपण साडीचा ड्रेस शिवणार असू तर त्यावर कॉन्ट्रास्ट दुपट्टा निवडू शकतो. ज्यामुळे तुमचा लूक अधिक शोभून दिसेल. 4 / 7जर आपण रेशमी कापडाचा ड्रेस शिवणार असू तर रंग लक्षात ठेवा. गडद रंगाचे कुर्ते आणि सूट प्रत्येक स्कीन टोनवर चांगले दिसतात. 5 / 7आपल्याकडे पेस्टल रंगाची साडी असेल तर आपण कट आणि खाली स्ट्रेट पॅन्ट शिवू शकतो. यामध्ये आपला लूक अधिक उठवदार दिसेल. 6 / 7ए-लाइन कुर्ती ड्रेस सध्या खूप चर्चेत आहे. या पद्धतीचे ड्रेस आपण सणसमारंभात किंवा लग्नात घालू शकतो. 7 / 7आपण शॉर्ट हातांची कुर्ती पॅन्ट शिवू शकतो. काळा रंग आणि सोनेरी छटा असलेला ड्रेस आपल्या सौंदर्यात भर घालेल.