Join us

Shravan Special 2025: जॉर्जेट ड्रेसचे ५ सुंदर प्रकार-येत्या सणावाराला कुठंही जा, दिसाल सर्वांपेक्षा सुंदर आणि स्टायलिश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2025 18:52 IST

1 / 7
जॉर्जेट फॅब्रिकला अनेक महिलांची पसंती पाहायला मिळते. सणासुदीच्या काळात किंवा ऑफिस-कॉलेजला जाताना आवर्जून घातले जातात. याचा घेर आणि सॉफ्ट फॅब्रिक खूप स्टायलिश असते. (Shravan dress for women)
2 / 7
रोजच्या वापरासाठी किंवा खास प्रसंगासाठी सूट शिवण्याचा विचार करत असाल तर हे डिझाईन्स नक्की ट्राय करुन पाहा. (Georgette kurti designs 2025)
3 / 7
जॉर्जेट फॅब्रिक वापरून आपण ड्रेस शिवू शकतो. हा आपल्याला स्टायलिश लूक देईल. गोल गळ्याचा ड्रेस आपल्या सौंदर्यात भर घालेल.
4 / 7
जॉर्जेटचा सलावर सूट कमी उंचीच्या मुलींना अधिक शोभून दिसतो. हा ड्रेस आपण रोजच्या वापरासाठी देखील घालू शकतो.
5 / 7
फॅन्सी अनारकली सूट दिसायला अधिक आकर्षक असतो. आपण षट्कोनी आकाराचा गळा आणि फुग्याचे हात ट्राय करु शकतो.
6 / 7
सध्या पलाझो सूटचा ट्रेड अधिक आहे.जर आपल्याला उंच दिसायचे असेल आणि पंजाबी लूक हवा असेल तर साधे फॅब्रिक निवडा. त्याला मिरर वर्क आणि लेस लावून अधिक सुंदर बनवा.
7 / 7
जॅकेट सूटचा ट्रेंड सध्या अधिक चर्चेत आहे. याला आपण पारंपारिक टच देऊ शकतो. यावर आपल्याला मॅचिंग किंवा सोनेरी लेस लावता येईल. ज्यामुळे त्याचा लूक अधिक सुंदर दिसेल.
टॅग्स : फॅशनमहिला