Shravan Special : फ्रील बाह्यांच्या ब्लाऊजचे ५ स्टायलिश पॅटर्न! बंगाली सिनेमातल्या नायिकांसारख्या दिसाल मोहक
Updated:July 24, 2025 18:04 IST2025-07-24T17:49:12+5:302025-07-24T18:04:52+5:30
Frill sleeve blouse designs : Festive blouse patterns Stylish: साध्या साडीला सुंदर, आकर्षित लूक मिळवायाचा असेल तर फ्रीलच्या बाह्यांचे ब्लाऊज ट्राय करु शकता.

श्रावण महिना सुरु झाला की सणांना सुरुवात होते. सणांच्या काळात आपण हौशीने साडी नेसतो पण महागड्या साडीसाठी नेमकं ब्लाऊज कसं शिवायला हवं हा प्रश्न अनेकांना पडतो. त्यात पावसाळ्यात आपल्याला घराबाहेर साडी नेसून जायचे असेल तर ब्लाऊजही नीट असायला हवे. (Frill sleeve blouse designs)
सध्या बाजारात अनेक नवीन प्रकारच्या साड्या आपल्याला पाहायला मिळतात. ऑफिससाठी किंवा सणसमारंभात महिला हलक्या-फुलक्या आणि सोबर साडीची निवड करतात. पण साध्या साडीला सुंदर, आकर्षित लूक मिळवायाचा असेल तर फ्रीलच्या बाह्यांचे ब्लाऊज ट्राय करु शकता. (Festive blouse patterns Stylish)
आपल्याला कट स्लीव्ह ब्लाऊज घालायला आवडत असतील तर त्याला वेगळ्या पद्धताने ट्राय करता येईल. ऑर्गेन्झा फॅब्रिकमध्ये या प्रकारच्या फ्रिल स्लीव्ह्ज खूप छान दिसतात.
आपण फुलपाखराच्या आकाराची स्लीव्ह्ज शिवू शकतो. हे दिसायला अधिक सुंदर असते. जर आपली साडी अधिक साधी असेल तर ही डिझाइन्स त्याची शोभा वाढवेल.
साध्या बाह्यांना फॅन्सी लूक देण्यासाठी आपण मॅचिंग नेट फॅब्रिकपासून स्लीव्हज बनवू शकता. या ब्लाऊजच्या नेकलाइनवरही मॅचिंग नेट वापरता येते.
पार्टी वेअर साडीसोबत स्टिच केलेला फॅन्सी ब्लाऊज घ्यायचा असेल तर रफल डिझाइन ट्राय करु शकता. हे दिसायला खूप चांगले दिसते आणि आपल्याला स्टायलिश लूक देते.
सध्या ब्लाउजमध्ये पफ्ड डिझाइन फॅशन ट्रेंडमध्ये आहे. हातांना आकर्षक करण्यासाठी, स्लीव्हजवर फ्रिल्स लावा. हे डिझाइन कोणत्याही प्रकारच्या फॅब्रिकमध्ये चांगले दिसते.