1 / 9मराठी महिला म्हंटली की नऊवारी साडी असं चित्र सिनेमात-कादंबरीत असतं. सहावारी साड्याही नेसल्या जातातच. पण महाराष्ट्रात साडी नेसण्याची पद्धतही प्रत्येक प्रदेश, समाज, प्रांतानुसार वेगळी होती. आपापल्या कामाच्या आणि रोजच्या धावपळीत वावरायला सोपी अशी साडी महिला नेसत. ते साडी प्रकार नेमके कोणते ते पाहूया..2 / 9कोळी पद्धतीची साडी नेसण्याची रीत वेगळी आहे. कॉटनची पातळ अशी ही साडी असते. कोळी महिला मासे साफ करण्यापासून विकण्यापर्यंत सर्व कामे करतात. ते करताना आराम वाटावा भरभर काम करता यावं अशी साडी नेसली जाते. केसांत भरपूर फुलं, गजरे, दागिने असा साजही असतो.3 / 9क्षत्रिय समाज म्हणजे लढवय्या समाज. युद्धावर जाणाऱ्यांपैकी एक. समाजातील महिलाही कणखर आणि हुशार होत्या. आता वेळेप्रसंगी वापरली जाणारी नऊवारी यांचा रोजचा पेहराव होता. डोक्यावरून पदर आणि अंगावर दागिने असायचे.4 / 9बरेचदा आदिवासी समाजाला मागास म्हटलं जातं. खरंतर स्वत:ची मुळ आजही जपून ठेवणारा हा समाज आहे. शेतीपासूनची सगळी कामं समाजातील महिला करतात. परकर आणि चोळी हा त्यांचा पेहराव असतो. वेगवेगळ्या धातुंपासून तयार केलेले दागिने त्या वापरतात.5 / 9अहिर समाजातील लोकांचे काम पूर्वी पशुपालन होते. महिला पूर्वी डोक्याला ओढणी, पोटापर्यंत लांब चोळी आणि घागरा वापरत असत. आता फार तो पेहराव पहायला मिळत नाही.6 / 9पावरा भिल्ल, पावरा कोळी हा सातपुडा टेकडीवर राहणाऱ्या माणसांचा समाज आहे. हे लोक शेती, मासेमारी, पशुपालन करतात. पावरा समाजातील महिला नाती नामक साडी नेसतात. ही शर्टसारखी चोळी आणि त्यावर नऊवारी पण फार वेगळ्याच पद्धतीची असते. आता या पेहरावाचे मात्र रुप बदलले आहे. नवीन पिढीतील महिला हा पेहराव करत नाही.7 / 9पोटऱ्यांपर्यंतची नऊवारी पूर्वी महिला नेसत. वारीत चालताना सोयीस्कर व्हावे म्हणून उंचीला साडी कमी असायची.8 / 9ब्राम्हण महिलांच्या नऊवारीचा काष्टा इतरांपेक्षा वेगळा असतो. टाचांपर्यंत साडी यायची. अंगावर शोभून दिसतील असे दागिने असायचे.9 / 9चंद्रपूर जिल्ह्यात हा समाज राहतो. या समाजातील महिलांचा पेहराव फारच वेगळा असतो. काळाच्या ओघात पेहरावात बदल झाला. या महिला गडध रंगाच्या साड्या नेसतात. मात्र डोक्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी बांधतात. फुलं, कापड, पंख आदी. पूर्वीच्या काळी महिला चोळी वापरत नसत, गळ्यात दागिने घालायच्या.