लग्नसराईसाठी घ्या निळ्या रंगाची भरजरी पैठणी; रॉयल ब्लू रंगात १० डिझाईन्स, राजेशाही लूक मिळेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 13:30 IST
1 / 10लग्नसमारंभासाठी निळ्या रंगाची (Royal Blue Paithani) भरजरी पैठणी हा उत्तम पर्याय आहे. यामुळे तुम्हाला सुंदर मराळमोळा लूक मिळेल तर या रंगात तुम्ही सर्वांपेक्षा जास्त उठून दिसाल. (10 Royal Blue Paithani Designs)2 / 10ब्लू पैठणी साडी हा लग्नसराईसाठी एक अतिशय आकर्षक आणि शाही पैठणीचा पर्याय आहे. जो अधुनिकता आणि पारंपारीकतेचा संगम साधते. (10 Patterns In Blue Color Paithani)3 / 10ही साडी महाराष्ट्रातील पैठण येथे हातानं विणली जाते. शुद्ध रेशिम आणि झरी वापरून तयार केली जाते. ज्यामुळे तिला विशिष्ट चमक आणि टिकाऊपणा येतो.4 / 10कलांजली पैठणी, मुनिया पैठणी, येवला पैठणी, अशा बऱ्याच पैठणीच्या प्रकारात तुम्हाला निळ्या रंगाची साडी उपलब्ध होईल.5 / 10साडीच्या मुख्य भागावर लहान लहान बुट्ट्या विणलेल्या असतात. यात चांदणी, अशर्फी किंवा पान यांसारखे पॅटर्न वापरले जाते.6 / 10 मठ्ठा पैठणी किंवा सेमी पैठणीतही हा रंग उठून दिसतो. सेमी पैठणीत रेशिम मिश्रित पर्याय उपलब्ध आहे.7 / 10२५०० रूपयांपासून २५००० पर्यंत यात विविध रेंजच्या पैठणी साडी तुम्हाला मिळतील.8 / 10या साड्यांच्या ब्लाऊजवर तुम्ही आरीवर्कचे ब्लाऊज शिवून घेतले तरी ते खूपच छान दिसेल.9 / 10निळ्या रंगाच्या साडीवर लाल, गुलाबी किंवा ग्रीन रंगाचं ब्लाऊज असेल तर हा कॉन्ट्रास्ट खूपच छान लूक देईल.10 / 10या साड्यांना मेंटेन करणं फार कठीण नाही. एकदा ड्राय क्लिन केल्यानंतर वर्षानुवर्ष त्या चांगल्या राहतात.