Join us

अंबानींच्या सूनबाईंची ५ लाखांहून महाग साडी, राधिका मर्चण्टच्या काळ्या डिझायनर साडीची ‘खास’ बात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 17:30 IST

1 / 8
राधिका मर्चंट ही भारतातील सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहे. राधिका तिच्या आनंददायी व्यक्तिमत्वाने आणि तिच्या गोंडस हास्याने सर्वांना मंत्रमुग्ध करण्याची एकही संधी सोडत नाही.(Radhika Merchant Dons A Black-Hued Shahab Durazi Saree Worth Rs. 5.85 Lakhs At NMACC Launch)
2 / 8
राधिका ही एक फॅशनिस्टा आहे आणि ती अनेकदा तिच्या फॅशनच्या स्टाईलनं सर्वांना थक्क करते आणि असाच काहीसा प्रकार NMACC च्या शानदार लॉन्चमध्ये पाहायला मिळाला जेव्हा राधिकाने काळ्या साडीत स्टायलिश एंट्री केली.
3 / 8
31 मार्च 2023 रोजी, अंबानी कुटुंबाने नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रासाठी एक भव्य उद्घाटन समारंभ आयोजित केला होता.
4 / 8
या कार्यक्रमाला जगभरातील अनेक नामवंत व्यक्तींनी हजेरी लावली होती. यावेळी अंबानी कुटुंबाची होणारी सून राधिका मर्चंट हिनंही अनंत अंबानी यांच्यासोबत हजेरी लावली.
5 / 8
या समारंभासाठी, ती काळ्या रंगाच्या इंडो-वेस्टर्न स्टाइलच्या साडीत आकर्षक दिसत होती. तिच्या पोशाखात पांढर्‍या रंगाच्या फुलांच्या धाग्याची नक्षी होती.
6 / 8
राधिकाने फुग्याच्या स्लीव्हजने सुशोभित केलेले नेकलाइन ब्लाउज घातले होते. तिची साडी शहाब-दुराझी या लेबलची होती आणि त्याची किंमत रु. ५,८५,००० असल्याचं समोर येत आहे.
7 / 8
यावर तिनं डायमंड नेकलेस, मॅचिंग अंगठी, सुंदर कानातले आणि ब्रेसलेटसह परफेक्ट लूक केला होता. डार्क लिपस्टीक, चमकदार डोळ्यांचा मेकअप, हायलाईट केलेले चिक बोन्स असा मेकअप केला होता.
8 / 8
तिच्या हातात चंदेरी रंगाची मिनी हर्मीस केलीमॉर्फोसची बॅग होती. या आर्म कँडी बॅगची किंमत ५२ लाख ३० हजार रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.
टॅग्स : नीता अंबानीखरेदीस्टायलिंग टिप्ससाडी नेसणे