Join us
Daily Top 2 Weekly Top 5

Party Wear saree : पाहा ७ सुंदर ग्लॅमरस साड्या, प्रत्येक पार्टीची शान तुम्हीच-साऱ्या नजरा तुमच्यावर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2026 16:20 IST

1 / 8
जरीकाठाची साडी तर आपण आवडीने आणि बरेचदा नेसतो. मात्र काही असे समारंभ असतात जिथे जरा फॅन्सी आणि वेगळ्या पद्धतीची साडी नेसली जाते. पार्टी वेअर साडीही सुंदर दिसते. पाहा प्रकार.
2 / 8
१. सिक्विन साडी – पूर्ण साडीवर चमकदार सिक्विन वर्क केलेले असते. उजेडात ही साडी खूप उठून दिसते आणि काळोखात चमकते पार्टीसाठी उत्तम पर्याय आहे.
3 / 8
२. नेट साडी – हलकी आणि स्टायलिश अशी ही साडी आधुनिक लुक देते. एम्ब्रॉयडरी किंवा स्टोन वर्कमुळे ती अधिक आकर्षक दिसते.
4 / 8
३. जॉर्जेट साडी – मऊ आणि फ्लोइंग फॅब्रिकमुळे ही साडी नेसायला सोपी आणि एलिगंट वाटते. रिसेप्शन किंवा एखाद्या पार्टीसाठी योग्य चॉइस आहे.
5 / 8
४. सिल्क पार्टीवेअर साडी – बनारसी, कांचीपुरम किंवा आर्ट सिल्क प्रकारात मिळणारी ही साडी पारंपरिक आणि रॉयल लुक देते. खास समारंभासाठी उत्तम आहे.
6 / 8
५. ऑर्गेंझा साडी – हलकी, पारदर्शक आणि थोडीशी कडक टेक्स्चर असलेली ही साडी सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. साध्या डिझाइनमध्येही ती उठून दिसते.
7 / 8
६. रेडी-टू-वेअर साडी – आधीच प्लीट्स आणि ड्रेप तयार असतात, शिवलेल्या साडीसारखीच असते. त्यामुळे पटकन नेसता येते. आधुनिक आणि सोयीस्कर पर्याय आहे.
8 / 8
७. रफल साडी – साडीच्या काठाला रफल्स किंवा लेयर्स असतात, ज्यामुळे फॅशनेबल आणि ग्लॅमरस लुक मिळतो.
टॅग्स : साडी नेसणेफॅशनमहिलासोशल मीडियासोशल व्हायरल