Join us

Navratri Fashion : दुर्गापूजेनिमित्त बंगाली पद्धतीची साडी नेसताय? ५ टिप्स- दिसाल सुंदर आकर्षक बंगालन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2025 17:51 IST

1 / 7
नवरात्र म्हणजे उत्साह, आनंद आणि रंगाचा उत्सव. या काळात विविध रंगाच्या साड्या, दांडिया आणि परंपरा साजरा केल्या जातात. नऊ दिवसातील सगळ्यात महत्त्वाचा दिवस अर्थात दुर्गापूजा. दुर्गापूजेनिमित्त सगळीकडे उत्साह असतो. ही पूजा फक्त बंगालमध्येच नाही तर देशभरातली अनेक शहरांमध्ये मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. ज्यामुळे महिला बंगाली पद्धतीच्या साड्या घालणे अधिक पसंत करतात.
2 / 7
लाल आणि पांढऱ्या रंगाची साडी, कपाळावर मोठी बिंदी, पदराला सुंदर प्रकारे ड्रेसिंग केलेल. हे सर्व उत्सवाला आणखी खास बनवतात. यंदाच्या दुर्गापूजेला बंगाली पद्धतीची साडी नेसणार असाल तर या ५ टिप्स लक्षात ठेवा.
3 / 7
बंगाली पद्धतीची साडी नेसताना ती पारंपरिकपणे लाल बॉर्डर असलेली पांढरी किंवा ऑफ- व्हाइट बेस साडी निवडायला हवी. कॉटन, सिल्क किंवा टॅसल साड्या बंगाली लूक पूर्ण करतात.
4 / 7
या साड्यांच्या पदराला ड्रेपिंग करतात तो रुंद आणि सुंदरपणे खांद्यावर गुंडाळलेला असतो. ज्यामुळे याला पारंपरिक टच मिळतो. ड्रेपिंग करताना प्लेट्स व्यवस्थित बसलेल्या आहेत की, नाही हे तपासा.
5 / 7
आपण साडी नेसल्यावर कपाळावर लाल मोठी, गोल बिंदी लावा. यामुळे आपला संपूर्ण मेकअप लूक छान दिसेल. तसेच यावर लाल किंवा गुलाबी रंगाची गडद बिंदी देखील छान दिसते.
6 / 7
या साडीवर सोनेरी दागिन्यांचा सेट घालणे चांगले. मोठे कानातले, बांगड्या आणि नेकलेस आपल्याला शाही बंगाली लूक देतात. यासाठी आपल्याला हातभर बांगड्या आणि मोठे कानातले घालायला हवे.
7 / 7
हेअरस्टाईलमध्ये आपण केसांचा बन बनवू शकतो. त्यावर जाईच्या फुलांनी किंवा लाल- पांढऱ्या फुलांनी सजवू शकतो. आपण यावर हेअरपिन लावून केसांच्या बनचे सौंदर्य आणखी वाढवू शकतो. मेकअपसाठी लाल लिपस्टिक आणि हलका डोळ्यांवर मेकअप करा.
टॅग्स : शारदीय नवरात्रोत्सव २०२५नवरात्रीफॅशन