Monsoon Office Wear : पावसाळ्यात ऑफिससाठी वापरा ६ सुंदर ड्रेस, पावसात भिजलात तरी नो टेंशन!

Updated:July 12, 2025 21:55 IST2025-07-12T21:48:00+5:302025-07-12T21:55:01+5:30

Monsoon outfit ideas for office : Monsoon fashion for working women : Office wear for rainy season : Rainy season dresses for office : कपड्यांचे खास पॅटर्न्स पाहूयात ज्यामुळे पावसात भिजून ऑफिसला गेलो तरी त्रासदायक वाटणार नाही व लुकही सुंदर दिसेल.

Monsoon Office Wear : पावसाळ्यात ऑफिससाठी वापरा ६ सुंदर ड्रेस, पावसात भिजलात तरी नो टेंशन!

पावसाळ्यात नेहमी ऑफिसला जाताना सगळ्यात जास्त भीती वाटते ती म्हणजे भिजण्याची! भिजल्यामुळे कपडे (Monsoon fashion for working women) अंगाला चिकटतात, संपूर्ण भिजून कपडे ओलेचिंब होतात आणि त्यामुळे ऑफिसमध्ये सगळा दिवस असाच भिजलेल्या कपड्यात घालवावा लागतो. अशा परिस्थितीत, फॅशनेबल परंतु पावसाळ्यात भिजल्यावरही त्रासदायक न वाटणारे व ऑफिस लुकला परफेक्ट मॅच होणाऱ्या अशा कपड्यांची निवड करणे गरजेचे असते.

Monsoon Office Wear : पावसाळ्यात ऑफिससाठी वापरा ६ सुंदर ड्रेस, पावसात भिजलात तरी नो टेंशन!

हलके, लवकर सुकणारे आणि आरामदायक कपड्यांची निवड केली, तर पावसाळ्यात भिजून (Office wear for rainy season) ऑफिसला गेलो तरी टेंन्शन नसते व ऑफिस लूकही आरामदायक आणि स्टायलिश (Rainy season dresses for office) दिसतो. आपण काही खास कपड्यांचे पॅटर्न्स पाहूयात ज्यामुळे पावसात भिजून ऑफिसला गेलो तरी त्रासदायक नाही वाटणार आणि लुकही सुंदर दिसेल.

Monsoon Office Wear : पावसाळ्यात ऑफिससाठी वापरा ६ सुंदर ड्रेस, पावसात भिजलात तरी नो टेंशन!

कॉटन किंवा लिननच्या जाड पलाझोऐवजी लवकर सुकणाऱ्या सिंथेटिक मटेरियलचे स्लिम पलाझो किंवा क्रेप पॅन्ट्स घालू शकता. यासोबतच त्यावर शॉर्ट लेन्थच्या कुर्तीज किंवा शर्ट परफेक्ट मॅच होतील.

Monsoon Office Wear : पावसाळ्यात ऑफिससाठी वापरा ६ सुंदर ड्रेस, पावसात भिजलात तरी नो टेंशन!

को-ऑर्ड सेट देखील आपण पावसाळ्यात घालू शकतो. याचा पायजमा थोडा फ्लोई आणि पायघोळ असतो त्यामुळे असा पायजमा पावसात भिजला तरी दिवसभर तो पायाला चिकटून राहत नाही. फ्लोई आणि पायघोळ मटेरियल असल्याने ते हवेशीर असल्याने पटकन वाळते. त्यामुळे पावसाळ्यात ऑफिससाठी को-ऑर्ड सेट उत्तम पर्याय ठरु शकतो.

Monsoon Office Wear : पावसाळ्यात ऑफिससाठी वापरा ६ सुंदर ड्रेस, पावसात भिजलात तरी नो टेंशन!

पावसाळ्यात जीन्स किंवा कॉटनच्या पॅंट्स घातल्या तर त्या भिजल्यावर तशाच ओल्याचिंब राहतात. यासाठीच, आपण पावसाळ्यात क्रॉप पँट्स आणि शर्ट चा बेस्ट ऑप्शन निवडू शकतो. क्रॉप पँट्स असल्यामुळे त्या अँकल लेन्थ असल्याने पावसात खालून भिजण्याची भीती नसते.

Monsoon Office Wear : पावसाळ्यात ऑफिससाठी वापरा ६ सुंदर ड्रेस, पावसात भिजलात तरी नो टेंशन!

पावसाळ्यात आपण अशा प्रकारचे शॉर्ट फ्रॉक्स देखील घालू शकतो. हे फ्रॉक्स घेताना रेयॉन मटेरियलचचे घ्यावेत. जे दिसताना कॉटन दिसत पण ते कॉटन नसत, यामुळे रेयॉन मटेरियल पावसात भिजल्यावर लगेच वाळतं. अशा प्रकारच्या फ्रॉक्समुळे आपल्याला दिवसभर ऑफिसमध्ये ओलेचिंब बसावे लागणार नाही.

Monsoon Office Wear : पावसाळ्यात ऑफिससाठी वापरा ६ सुंदर ड्रेस, पावसात भिजलात तरी नो टेंशन!

शॉर्ट स्कर्ट हा देखील एक उत्तमम पर्याय आहे. उंचीला शॉर्ट असलयाने स्कर्ट खालून भिजत देखील नाही आणि तुम्हांला परफेक्ट ऑफिस लूक देखील देतो.

Monsoon Office Wear : पावसाळ्यात ऑफिससाठी वापरा ६ सुंदर ड्रेस, पावसात भिजलात तरी नो टेंशन!

आपण पावसाळ्यात क्रॉप पँट्स आणि त्यावर कुर्तीज देखील घालू शकतो. या क्रॉप पँट्स अँकल लेन्थ असल्याने पावसात खालून भिजण्याची शक्यता नसते.