Join us

बोले चूड़ियां..! येत्या श्रावणात भरा चमचमत्या नव्या बांगड्या, पाहा ६ नवीन सुंदर डिझाइन्स!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2025 18:58 IST

1 / 9
पारंपरिक वेशभुषा करून छान तयार झाल्यावर हातात सुंदर, नाजूक बांगड्या हव्याच.. त्याशिवाय सौंदर्य कसं बरं खुलून येणार.. एरवी कित्येक जणी रोज बांगड्या घालत नसल्या तरी सणावाराला, कार्यक्रमांना, काही खास प्रसंगांना बांगड्या घालतातच..
2 / 9
मेटलच्या बांगड्यांमध्ये खूप वेगवेगळे डिझाईन्स मिळतात. पण काचेच्या बांगड्या मात्र बऱ्याचदा सारख्याच, एकसुरी वाटतात.
3 / 9
पण आता मात्र त्यातही खूप बदल झाला असून काचेच्या बांगड्यांचे कित्येक नवनविन प्रकार बाजारात तसेच ऑनलाईन शॉपिंग साईटवर पाहायला मिळत आहेत.
4 / 9
या बांगड्यांना रेनबो बांगड्या म्हणतात. कारण एकाच बांगडीमध्ये कित्येक रंग दिसून येतात. त्यामुळे कोणत्याही रंगाच्या साडीवर, ड्रेसवर तुम्ही त्या घालू शकता. मॅचिंग बांगड्यांचा प्रश्नच येत नाही.
5 / 9
ज्या महिला रोज बांगड्या घालतात त्यांच्यासाठी असे गोठ छान आहेत. हे हातात नाजुकही दिसतात.
6 / 9
असे स्टोनवर्क केलेले गोठ फक्त मेटलच्या बांगड्यांमध्येच दिसायचे. ते आता मात्र काचेच्या बांगड्यांमध्येही आले आहेत. यात खूप वेगवेगळे डिझाईन्स उपलब्ध आहेत.
7 / 9
सोनेरी वर्क असणाऱ्या या काचेच्या बांगड्या पहिल्यांदा पाहिल्यास कोणालाही मेटलच्याच वाटू शकतात एवढं त्याच्यावरचं काम सुबक, सुंदर आहे.
8 / 9
काचेच्या बांंगड्यांचा हा एक प्रकार पाहा.. या बांगड्या तुम्ही एकेकही घालू शकता किंवा तुमच्या कपड्यांनुसार रंग ठरवून ४ ते ५ बांगड्या एका हातात घातल्या तरी चालते.
9 / 9
स्टोनवर्क आणि सुबक पेटींग असणाऱ्या या बांगड्या पाहा. हा प्रकार काचेच्या बांगड्यांमध्ये अतिशय नवा आहे.
टॅग्स : फॅशनदागिनेस्टायलिंग टिप्सखरेदीऑनलाइन