By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 17:27 IST
1 / 9साडीमध्ये स्लिम आणि आकर्षक दिसण्यासाठी खालील ८ ते १० टिप्स तुम्ही फॉलो करू शकता. (How To Look Slim In Saree)2 / 9शिफॉन, जॉर्जेट किंवा क्रेप यांसारखे हलके आणि अंगाला चिकटून बसणारे कापड निवडा कारण ते फुगत नाही.3 / 9काळा, मरून किंवा नेव्ही ब्लू यांसारख्या गडद रंगाच्या साड्यांमध्ये शरीर सडपातळ दिसते.4 / 9साडीवर मोठ्या फुलांऐवजी लहान डिझाईन्स किंवा उभ्या रेषा असाव्यात.5 / 9पदर मोकळा सोडण्यापेक्षा त्याच्या निऱ्या करून पिन लावल्यास खांदे आणि कंबर सुटसुटीत दिसते.6 / 9साध्या पेटीकोटऐवजी साडी शेपवेअर वापारा. ज्यामुळे पोटाचा भाग सपाट दिसतो.7 / 9साडीच्या निऱ्या एकाच ठिकाणी खूपच जाड होणार नाहीत याची काळजी घ्या आणि त्या व्यवस्थित पसरवून खोचा.8 / 9लांब हाताचे आणि व्ही नेक ब्लाऊज घातल्यानं हात आणि मान लांब आणि स्लिम वाटते. गळ्यात खूप जड दागिने न घालता लांब कानातले निवडा. यामुळे चेहऱ्याचा आणि मानेचा भाग सुंदर दिसतो.9 / 9साडी नेसण्यापूर्वी हिल्स किंवा उंच सॅण्डल घातल्यानं तुमची उंची जास्त वाटते लूक स्लिम येतो.