1 / 9व्हॅलेंटाईन्स डे साठी डेटवर जाताना ड्रेस कसा घालावा किंवा साडी नेसायची तर कोणती नेसावी, कसा मेकअप करावा यासारखे बरेच प्रश्न पडले असतील तर बॉलीवूड अभिनेत्रींचे हे काही हॉट रेड लूक एकदा बघाच.2 / 9सध्या सेक्वीन वर्कची खूप फॅशन आहे. अशी सॅक्वीन वर्कची साडी आणि त्यावर स्लीव्हलेस ब्लाऊज असा लूकही एकदम हटके दिसेल.3 / 9व्हॅलेटाईन्स डे स्पेशल पार्टीला जाणार असाल तर असा एखादा सुंदर वनपीसही छान दिसेल. 4 / 9हा बघा रकुल प्रीतचा एक छानसा लूक. असा साधाच ड्रेस असला तरी तो खूप छान पद्धतीने कॅरी करता येतो.5 / 9लाँग ड्राईव्ह, डिनर असा प्लॅन असेल तर अनन्या पांडेसारखा असा शॉर्ट वनपीसही तुम्ही घेऊ शकता..6 / 9इंडियन वेअर किंवा ट्रॅडिशनल कपडे घालावे वाटत आहेत, पण तेही थोडे क्लासिक आणि हटके लूक देणारे पाहिजेत असतील तर असे काही कपडे ट्राय करा.7 / 9श्रद्धा कपूरचा हा लाल रंगाचा जम्पसूट बघा.. असं काही वेगळंही छान दिसेल.8 / 9असा एकदम झकास लुक करूनही तुम्ही डेटवर जाऊ शकता. आधी ऑफिस आणि नंतर डेट असा प्रोग्राम असेल तर हा ड्रेस एकदम परफेक्ट आहे9 / 9साडी, वन पीस असं काही घालायचं नसेल तर असा साधा लाल रंगाचा शर्ट किंवा टी-शर्ट आणि त्यासोबत रेड किंवा ब्लॅक जीन्स अशा कपड्यांमध्येही तुम्ही खूप स्टायलिश दिसू शकता..