Join us

साडी नेसल्यावर फुगते-साडीत जाड दिसता? ७ टिप्स, चापून-चोपून बसेल साडी-स्लिम दिसाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 20:57 IST

1 / 8
साडी फुगू नये परफेक्ट दिसावी यासाठी काही टिप्स तुम्ही माहीत करून घ्यायला हव्यात. साडी परफेक्ट दिसण्यासाठी तुम्ही पेटीकोट कोणता, कसा निवडता हे फार महत्वाचं असतं. आजकाल बॉडी फिटिंग पेटीकोट बाजारात आले आहेत त्याची निवड करा. (Easy Way To Drape Saree)
2 / 8
पेटीकोटची उंची जमिनीपासून फक्त 1 ते 1.35 इंच वर ठेवावी. पेटीकोट खूप खाली किंवा खूप वर नासावा. (How To Drape Saree Perfectly)
3 / 8
साडी नेसायला सुरूवात करताना नाभीच्या अगदी बाजूला आणि शरीरापासून थोडीशी घट्ट बांधा ज्यामुळे साडी व्यवस्थित बसते.
4 / 8
पहिली प्लेट नेहमी डावीकडून उजवीकडे हिप्सच्या दिशेनं तिरकस खोचा.
5 / 8
समोरच्या प्लेट्स साधारण 4 ते 5 इंच रूंद असाव्यात त्या व्यवस्थित पकडून एकावर एक सरळ रेषेत पिनअप करा.
6 / 8
साडी फुगू नये यासाठी योग्य ठिकाणी पीन लावा विशेषत:प्लेट्स एकत्र करून पेटिकोटला जोडण्यासाठी आणि शोल्डरवरील पदर ब्लाऊजला जोडण्यासाठी लहान सेफ्टी पिन्सचा वापर करा.
7 / 8
जॉर्जेट, शिफॉन, क्रेप किंवा सिल्क ब्लेंड्स असे हलके आणि शरीराला चिकटून राहणारे फॅब्रिक निवडा. कॉटन, ऑर्गेन्झा किंवा कांजीवरम साड्या फुगण्याची शक्यता असते.
8 / 8
कंबर स्लिम दिसावी यासाठी साडीचा पदर समोरून आणताना तो कंमरेच्या अगदी घट्ट बाजूनं पीन करा. साडी नेसल्यानंतर १५ ते २० मिनिटं आधी व्यवस्थित पाहा. कुठे फुगल्यासारखं वाटत असेल तर करेक्शन करता येईल.
टॅग्स : खरेदीब्यूटी टिप्सफॅशन