कोणत्या वयात कोणती ब्रेसियर वापरावी? परफेक्ट लूकसह कम्फर्टसाठी ‘हे’ विसरु नका...
Updated:February 15, 2025 18:14 IST2025-02-15T17:52:00+5:302025-02-15T18:14:27+5:30
How to choose bra by age group & differen body types for comfortable & confidence know these recommendations : How to choose bra by age group : वयोमानानुसार महिलांनी कोणत्या वयात कोणत्या प्रकारची किंवा पॅटर्नची ब्रेसियर घालावी ते पाहा...

वयोमानानुसार महिलांच्या शरीरात अनेक बदल होत असतात. या बदलांचा (How to choose bra by age group) परिणाम महिलांच्या शरीराप्रमाणेच त्यांच्या स्तनांवर देखील होतो. किशोरवयीन ते वृद्धापकाळापर्यंत, प्रत्येक वयात योग्य साईज आणि आकाराच्या ब्रेसियरची निवड करणे तितकेच महत्वाचे असते.
ब्रेसियर हे एक स्त्रियांचे महत्वाचे वस्त्र आहे. हे वस्त्र स्त्रिया नेहमी परिधान करतात. ज्यामुळे स्तन आकारात येते. शिवाय स्त्रियांचे पोस्चर सुधारते. बाजारात विविध प्रकारचे ब्रा मिळतात. पण मग असा प्रश्न समोर येतो की, आपल्या वयानुसार नेमक्या कोणत्या प्रकारच्या ब्रेसियरची निवड करावी? योग्य वयात परफेक्ट साईज तसेच योग्य आकारची किंवा शेपची ब्रेसियर घातल्यास त्याचा फायदाच होतो.
यासाठीच, वयोमानानुसार महिलांनी कोणत्या वयात कोणत्या प्रकारची किंवा पॅटर्नची ब्रेसियर निवडावी ते पाहूयात.
१. किशोरवयीन मुलींसाठी (१२ ते १८ वर्षे) :-
किशोरावस्थेत असताना मुलीच्या शरीरात अनेक बदल सतत होत असतात. या काळात शरीराची वाढ होत राहते. अशा परिस्थितीत, परफेक्ट साईज आणि शेपची ब्रेसियर शरीराला आधार आणि आराम देण्याचे काम करते. या वयोगटासाठी स्पोर्ट्स ब्रा पॅटर्नची ब्रेसियर ही सर्वात योग्य आहे कारण ती स्तनांना सौम्य आधार देते. या वयात कॉटनच्या कापडापासून तयार केलेल्या ब्रेसियर वापरणे हा देखील सर्वोत्तम पर्याय ठरु शकतो. याशिवाय, या वयाच्या मुली पॅडेड ब्रेसियर देखील वापरू शकतात, कारण पॅडिंगमुळे वाढत्या वयातील स्तनांना योग्य आकार देण्यास मदत होते.
२. तरुणवयीन स्त्रियांसाठी (१८ ते ३० वर्षे) :-
साधरणतः १८ ते ३० या वयात महिला अधिक अॅक्टिव्ह असतात. अशा परिस्थितीत, त्यांच्या स्तनांना आधार आणि आराम अशा दोन्ही गोष्टी देणाऱ्या ब्रेसियरची आवश्यकता असते. या वयोगटासाठी टॉप - फिट ब्रा हा एक चांगला पर्याय आहे. या प्रकारच्या ब्रेसियर स्तनांना आधार आणि आराम देतात सोबतच त्या व्यवस्थित फिटिंग मध्ये देखील बसतात. याव्यतिरिक्त, वायर ब्रा स्तनांना अधिक आधार देतात, विशेषतः जेव्हा तुम्ही जास्त अॅक्टिव्ह असता. यासोबतच एक्सरसाइज करताना स्पोर्ट्स ब्रा घालणे अधिक चांगले ठरु शकते.
३. मध्यमवयीन महिला (३० ते ५० वर्षे) :-
मध्यमवयीन वयात, शरीरात आणि स्तनांमध्ये अनेक बदल होतात, जसे की स्तनाचा आकार कमी होणे आणि त्वचा सैल होणे इत्यादी. अशा परिस्थितीत, स्तनांना चांगल्या सपोर्टची गरज असते. अशावेळी स्तनांच्या आकाराला अनुकूल असलेली ब्रेसियर घालणे अधिक फायदेशीर ठरेल. अशी ब्रेसियर जी स्तनांना योग्य आकारात ठेवण्यास मदत करेल. याशिवाय, पॅडेड ब्रा स्तनांचा आकार योग्य आणि परफेक्ट शेपमध्ये राखण्यास मदत करू शकते. जर तुम्हाला कम्फर्ट हवा असेल तर नेहमी मऊसूत आणि कॉटनच्या कापडाची ब्रेसियर घालावी.
४. ज्येष्ठ महिला (५० वर्षे आणि त्याहून अधिक) :-
वाढत्या वयोमानानुसार स्तनांमध्ये अधिक बदल होतात. म्हणून, या वयात स्तनांना सपोर्ट देणाऱ्या ब्रेसियरची आवश्यकता असते. तुम्ही प्लस - साईजच्या सपोर्टिव्ह ब्रा ची निवड करु शकता.
अशाप्रकारे, योग्य ब्रा निवडणे हे तुमच्या शरीराच्या रचनेवर आणि वयावर अवलंबून असते. प्रत्येक वयात तुमच्या गरजा वेगवेगळ्या असतात आणि या गरजा लक्षात घेऊन, योग्य प्रकारची ब्रेसियर घालणे खूप महत्वाचे असते.