1 / 7साडीवर आणि इतर ड्रेसवर सारख्याच बांगड्या सुट करत नाहीत. पाहा विविध प्रकार जे नक्कीच सुंदर दिसतात. 2 / 7आजकाल कॉटनची साडी पुन्हा ट्रेंडींग आहे. या साध्या एकरंगी साड्यांवर क्राफ्टेड किंवा डिझाइनर बांगड्या फार सुंदर दिसतात. 3 / 7भरपूर बांगड्या भरायला आवडत नाहीत? मग हा प्रकार अगदी तुमच्यासाठीच. हातात नाजूक सुंदर असं कडं घाला. घालायलाही सोपं असतं. दिसतंही रॉयल. 4 / 7आता मल्टीउज बांगड्याही मिळतात. म्हणजे फक्त साडीसाठीच नाही तर ड्रेस, कुर्ता किंवा इतरही कपड्यांसोबत साजेसे दिसतील असे प्रकार. 5 / 7वेस्टर्न वेअरवरही सुट होणारे काही प्रकार असतात. जिन्स घातल्यावर हातात आपण काही घालत नाही. पण हा कड्याचा प्रकार खास अशाच कपड्यांसोबत घालण्यासाठी आहे. 6 / 7काही तुर्कीश डिझाइन आता ट्रेंडींग आहेत. त्यावर सुंदर चित्र आणि रंग असतात. नाजूक , छान असा हा प्रकार आरामात बाजारात मिळेल. 7 / 7ब्रेसलेट्सचे विविध प्रकार असतात. त्यापैकी हा प्रकार वर्षानुवर्षे वापरला जात आहे. जरा वेगळ्या आकारामुळे तो लोकप्रिय ठरतो.