1 / 13श्रावण महिना म्हटलं की सणवारांचा माहोल, सणावाराला प्रत्येक लुकसोबत हेअर स्टाईलही (hair accessories for Shravan festival) तितकीच उठून दिसावी अशी प्रत्येकीची इच्छा असते. साडी, ड्रेस किंवा लहंगा अशा कोणत्याही लुकसोबत वेगवेगळ्या हेअरस्टाईल्स केल्या जातात, आणि त्या अधिक आकर्षक दिसाव्यात यासाठी योग्य हेअर ऍक्सेसरीजचा वापर अधिक फायदेशीर ठरतो. 2 / 13आजकाल बाजारात अनेक प्रकारचे स्टायलिश आणि ट्रेडिशनल हेअर (how to style hair for Shravan festival) ऍक्सेसरीज उपलब्ध आहेत. 3 / 13गजरा, बीडेड पिन्स, झुमका स्टाईल क्लिप्स, कुंदन टिकली, फॅन्सी स्क्रंचीज, ब्रेड क्लिप्स आणि भरजरी हेडबँड्स आणि बरंच काही... अशा वेगवेगळ्या प्रकारच्या हेअर ऍक्सेसरीजचा (Hair Accessories For Shravan Festivale Look) वापर करुन आपण आपली हेअर स्टाईल अधिक सुंदर व आकर्षक करु शकतो. यामुळे आपला लूक देखील चारचौघीत उठून दिसतो. 4 / 13पांढऱ्याशुभ्र मोत्यांनी सजवलेली ही अशी पर्ल चेन तुमच्या हेअर स्टाईलला क्लासिक आणि एलिगंट लुक देईल. साडी, ड्रेस सारख्या इतर पारंपरिक पोशाखावर ही पर्ल चेन अधिक शोभून दिसेल. 5 / 13बऱ्याचजणी सणवाराला महाराष्ट्रीयन स्त्रियांची पारंपरिक हेअरस्टाईल म्हणजे अंबाडा घालतात. हा अंबाडा सजवण्यासाठी खास प्रकारची अंबाडा पिन किंवा हेअर ऍक्सेसरीज वापरली जाते. जेणेकरुन या साध्यासुध्या आंबाड्याला देखील खूप सुंदर लूक येतो. 6 / 13आपण अशा प्रकारच्या हेअर ऍक्सेसरीज देखील केसांत लावून आपला लूक अधिक खुलवू शकतो. कर्णफुलासोबत जोडलेली चेन डोक्याच्या मागच्या बाजूला, केसांच्या मध्यभागी लावली जाते. यामुळे तुमच्या पारंपरिक लुकला अधिक देखणा आणि राजेशाही लूक येतो. 7 / 13जर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारात वेणीची हेअर स्टाईल करणार असाल तर त्यावर अशा प्रकारची हेअर ज्वेलरी अधिकच सुंदर दिसते. यामुळे साध्या वेणीचा लूकही खास दिसतो. 8 / 13खोपा हेअरस्टाईलमध्ये वापरण्यात येणारी अंबाडा रिंग अस्सल मराठमोळा लूक देते. ही रिंग गोलाकार असते आणि ती मेटल, कुंदन, पर्ल, स्टोन्स किंवा झरी वर्कने सजवलेली असते. मोगऱ्याच्या गजऱ्यासोबत ही अंबाडा रिंग लावल्यास केसांची हेअर स्टाईल आकर्षक आणि शाही दिसते.9 / 13जर तुम्ही गाऊन, अनारकली कुर्ती किंवा इंडो-वेस्टर्न स्टाईलचे कपडे घालणार असाल तर अशा प्रकारच्या सुंदर आणि चमकदार हेअर बँडचा वापर करू शकता. पारंपरिक आणि मॉडर्न लुक यांचा सुंदर मिलाफ साधण्यासाठी हे बँड एक उत्तम पर्याय ठरतात.10 / 13सध्या चंद्रकोर आकारातील पिन्स फारच ट्रेंडिंग असल्याने आपण या पिन्स हेअर स्टाईलमध्ये रोवून अगदी पारंपरिक लूक मिळवू शकता. विशेष करुन नऊवारी साडीवर हे अधिक जास्त शोभून दिसेल. 11 / 13हेअर स्टाईलवर आपण अशा प्रकारची झुमका चेन लावून हेअर स्टाईल अधिक सुंदर व आकर्षक करु शकता. आंबाडा घालून त्यावर मागच्या बाजूला ही हेअर ज्वेलरी घालू शकता. 12 / 13जर तुम्हाला अगदी साधासुधा आणि पटकन होणारा हेअर लूक हवा असल्यास आपण अशा प्रकारच्या हलक्याफुलक्या फ्लोरल हेअर ऍक्सेसरीजने आपली हेअर अधिक जास्त चांगल्या पद्धतीने सजवू शकता. 13 / 13फ्लोरल बन नेट या प्रकारात आपण फुलांच्या पाकळ्या किंवा कळ्यांच्या मदतीने हेअर स्टाईलला एकदम हटके आणि नेहमीपेक्षा काहीतरी वेगळा खास लूक देऊ शकता.