Join us
Daily Top 2 Weekly Top 5

Gudi Padwa 2026: गुढीपाडव्याला नेसा पारंपरिक मराठमोळी नऊवारी साडी! रेडी-टू-वेअरचे ५ लेटेस्ट पॅटर्न; मिनिटांत मिळेल राजघराण्यासारखा लूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2026 10:11 IST

1 / 7
गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येक स्त्रीचा अट्टाहास असतो नऊवारी साडीचे नेसून पारंपरिक रूपात सजण्याची ओढ असते. पण ऊन आणि वेळेमुळे अनेकदा आपल्याला परफेक्ट साडी नेसता येत नाही. नऊवारी साडी नेसताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. काष्ठा किंवा पदर नीट येत नाही. (Ready made nauvari saree designs)
2 / 7
सध्या बाजारात रेडी-टू- वेअर नऊवारी साडीचे विविध पॅटर्न पाहायला मिळतात. ५ मिनिटांत एखाद्या पँटसारखी ही साडी परिधान करून आपण अप्सरा लूक मिळवू शकतो. ही साडी सावरण्याची भीती नसते आणि ती दिवसभर अतिशय कम्फर्टेबल राहते.(5 minute nauvari saree trick)
3 / 7
शाही मस्तानी पॅटर्न हा सध्याचा सर्वात लोकप्रिय नऊवारीचा प्रकार आहे. या साडीला समोरुन सुंदर काठ असते. जी चालताना खूप ग्रेसफुल दिसते.
4 / 7
आपल्याला अस्सल पारंपरिक आणि मराठी लूक हवा असेल तर ब्राह्मणी पॅटर्न चांगला आहे. याला मागे काष्ठा असतो. ही साडी पूजेसाठी किंवा धार्मिक विधींसाठी अतिशय साजेसा लूक देते.
5 / 7
राजलक्ष्मी पॅटर्न मस्तानी आणि ब्राह्मणी नऊवारीचे मिश्रण आहे. यात समोरून पायघोळ काठ असतात आणि मागे काष्ठा असतो. आपल्याला रॉयल लूक हवा असेल तर पाडव्याला राजलक्ष्मी नऊवारी ट्राय करा.
6 / 7
पाडव्याला शोभायात्रेत सहभागी व्हायचं असेल किंवा लेझीम खेळायचं असेल, तर कळीची नऊवारी निवडा. ही साडी दिसायला अत्यंत सुंदर आणि सुटसुटीत असते. यात सहज आपल्याला चालता येते.
7 / 7
सध्याच्या Gen-z साठी फॅशनेबल पर्याय धोती स्टाईल नऊवारी साडी ट्राय करु शकता. ही साडी इंडो-वेस्टर्न लूक देते. यावर आपण बेल्ट किंवा जॅकेट घालून नवीन फॅशन करु शकतो.
टॅग्स : गुढीपाडवाफॅशनमहिलाभारतीय उत्सव-सणगुढीपाडवा 2026