Join us

लग्नसराईसाठी कमी बजेटमध्ये घ्या साऊथ स्टाईल साड्या; १० सिल्क साड्यांचे नवीन कलेक्शन....

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 19:30 IST

1 / 9
साडीची फॅशन कधीच आऊटडेटेड होत नाही. साडीमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे लूक्स ट्राय करता येतात. एकच साडी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या दागिन्यांवर अनेकदा नेसू शकता. साडी नेसून तुम्ही महारानी लूक क्रिएट करू शकता कसा ते पाहूया. (Famous South Indian Saree For Rich And Elegant Look)
2 / 9
साऊथ इंडियाची फेमस कांजीवरम साडी दिसायला खूपच भरजरी आणि स्टायलिश दिसते. दीपिका, रेखा, अथिया शेट्टी, माधुरी या साड्यांमध्ये दिसून येते. (The Most Popular Sarees From South Indian)
3 / 9
साऊथ इंडीयन साड्या तुम्ही ऑर्डर देऊन बनवू शकता. याची खासियत अशी की वर्क आणि कापड जरीचे असते. लग्नसमारंभासाठी उत्तम आहेत.
4 / 9
कॉस्ट्रास्ट बॉर्डर आणि लाईट वेट असलेली मैसूर सिल्क साडी तुम्ही कार्यक्रम किंवा ऑफिस पार्टीसाठी कॅरी करू शकता.
5 / 9
मैसूर सिल्क साडी लाईटवेट असल्यामुळे कोणत्याही सिजनमध्ये परफेक्ट बसेल.
6 / 9
क्रिम बॉर्डरवर क्रिम कलरची कसावू साडी उत्तम दिसते. ही साडी साऊथ इंडियन लग्न, पूजा, फंक्शनमध्ये सर्वाधिक घातली जाते.
7 / 9
तेलंगणाची फेमस पोचमपल्ली साडी कॉटन आणि सिल्क फॅब्रिकपासून तयार झालेली असते. ऑफिसला जाणाऱ्या महिला अशी साडी नेसतात.
8 / 9
पट्टू साडी साऊथ इंडीयामध्ये प्रसिद्ध आहे. सिल्कच्या फॅब्रिकपासून ही साडी तयार होते. याच कलरफुल रंग लग्न किंवा खास प्रसगांना अधिकच खास बनवतो.
9 / 9
या व्यतिरिक्त चेट्टीनाड साडी, धर्मावरम साडी, कोनराड साडी, गडवाल साडी या साड्यासुद्धा उत्तम आहेत.
टॅग्स : फॅशनखरेदीब्यूटी टिप्स