By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 16:13 IST
1 / 10जुन्या साडीचा पुर्नवापर करून आजकाल अतिशय स्टालिश आणि युनिक ड्रेसेस तयार केले जात आहे. केवळ काठ पदर न वापरता काही नवीन आयडीया वापरून तुम्ही तुमचे व्यक्तीमत्व खुलवू शकता. (10 Ideas Of Dresses From Old Saree)2 / 10सध्या फॅशनमध्ये असलेले को आर्ड सेट्स जुन्या सिल्क किंवा कॉटन साड्यांचा वापर करून तुम्हाला तयार करता येतील.3 / 10साडीच्या एकाच कापडापासून तयार केलेल शर्ट आणि पँट किंवा टॉप आणि स्कर्ट अत्यंत अधुनिक दिसतात.4 / 10जर साडीचे कापड मऊ किंवा जॉर्जेट असेल तर त्यापासून फ्लोई काफ्तान किंवा लांब फ्रॉक तयार करता येतो. हे इंडो वेस्टर्न लूकसाठी परफेक्ट ठरतात.5 / 10साडीचे काठ किंवा फाटलेल्या साडीचे चांगले भाग जोडून बोहो स्टाईल जॅकेट बनवता येतात.6 / 10साडीच्या लांबीच्या फायदा घेऊन फ्लोर लेंथ श्रग तयार करा. जीन्स आणि टॉपवर अशा श्रग असा घातल्यास साध्या पेहरावालाही रॉयल लूक मिळतो.7 / 10सध्या अनारकलीपेक्षा साडीच्या कापडाचे वेगवेगळे लेअर्स असलेला टायर्ड ड्रेस सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहे.8 / 10साडीच्या कापडापासून धोती पँट किंवा सिगारेट पँट शिवून त्यावर कॉन्ट्रास्ट रंगाचा क्रॉप टॉप घातल्यास तो एक मॉडर्न फ्युजन ड्रेस तयार होतो.9 / 10लग्नकार्याला जाण्यासाठी तसंच घरात पुजा किंवा कोणताही कार्यक्रम असल्यास हे ड्रेसेस उत्तम लूक देतात.10 / 10तुम्हाला जॅकेटसारखा लूक हवा असेल तर तुम्ही साडीच्या जॅकेटलाच जोडून सुंदर श्रग तयार करू शकता.